Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गोष्ट पैशापाण्याची; योग्य आर्थिक नियोजन तुम्हालाही करोडपती बनवू शकते!
महाराष्ट्र संवाद विशेष

गोष्ट पैशापाण्याची; योग्य आर्थिक नियोजन तुम्हालाही करोडपती बनवू शकते!

सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी गिरवले अर्थ साक्षरतेचे धडे !
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/01/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

राजुर : झोपेत असतानाही आपल्यासाठी आपल्या पैशांनी काम केले पाहिजे. श्रीमंती प्रत्यक्षात उतरण्यासाठी व आपल्या ध्येयांना आणि स्वप्नांना अर्थ प्राप्त होण्यासाठी महागाईवर मात करणारी गुंतवणूक करून आपली स्वप्ने साकार केली पाहिजेत. त्यासाठीचे आर्थिक नियोजन म्हणजेच अर्थसाक्षरता होय, असे प्रतिपादन कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनील कडलग यांनी केले.

सत्य निकेतन संस्थेच्या रा. वि.पाटणकर सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांच्या संकल्पनेतून ‘गोष्ट पैशापाण्याची’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी कडलग यांच्या मार्गदर्शनाने अर्थ साक्षरतेचे धडे गिरवले. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य आण्णासाहेब धतुरे, प्रा. शरद तुपविहिरे, प्रा. रमेश शेंडगे, प्रा. संतोष कोटकर, प्रा. बाळासाहेब घिगे आदी उपस्थित होते.

कडलग यांनी अगदी डेबिट कार्ड कसे वापरावे, गुगल पे, फोन पे अॅपचा वापर कसा करावा, याबद्दल मार्गदर्शन केले. आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी अर्थसाक्षर होणे गरजेचे आहे. अर्थसाक्षरतेने मोठे आर्थिक निर्णय घेणे सोपे होतात. आर्थिक उद्दिष्ट्रय साध्य करण्यासाठी म्युच्युअल फंड, एसआयपी, शेअर मार्केट , लिक्विड फंड, टर्म इन्शुरन्स, आरोग्य विमा, अपघात विमा यांचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे. आर्थिक नियोजनात आरोग्य विमा नसेल, तर अचानक मोठे आजारपण आले, तर आपली सर्व बचत, गुंतवणूक त्यातच खर्ची पडू शकते.

आर्थिक नियोजनात आयुर्विम्याचे व अपघाती विम्याचे कवच घेतले असल्यास कमावत्या व्यक्तीच्या आकस्मिक निधनामुळे किंवा अपघाती कायमस्वरूपी अपंगत्वामुळे येणारे आर्थिक संकट टाळणे शक्य होते. आरोग्यासाठी बचत करण्याबरोबर गुंतवणूकही महत्वाची ठरते. कारण गुंतवणुकीमुळे संपत्ती वाढते, तसेच नियमित गुंतवणुकीमुळे आर्थिक आरोग्य चांगले राहते. कडलग यांनी इच्छा, गरज, बचत व गुंतवणूक यांतील फरकही समजावून सांगितला.

भारताची ६०% हून अधिक लोकसंख्या ही युवक वर्गाची आहे. युवक खर्च करत आहेत. त्यामुळे कंपन्यांचा नफा वाढून शेअर बाजारही वाढत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीचा वेग वाढत असल्याचा परिणाम गुंतवणूकदारांच्या संपत्ती वाढ होत आहे. ज्या देशात खर्च होतो, तोच देश संपत्ति निर्माण करतो. म्हणूनच भविष्यात गुंतवणूकदार म्युच्युअल फंडच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करतील. भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाने ५० लाख कोटींचा टप्पा ओलांडला असून त्याची आश्वासक वाटचाल आता शंभर लाख कोटींकडे चालू झाली आहे.

सध्या गुंतवणूकदार १७ हजार करोडपेक्षा अधिक रक्कम प्रति महिन्याला एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंड योजनेत गुंतवित असल्याचेही त्यांनी सांगितले. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून सामान्य माणूस कोट्याधीश होऊ शकतो. पाश्चात्त्य देशांमध्ये प्राथमिक शिक्षणातच अर्थ साक्षरतेचा समावेश केला गेलेला आहे. भारतातही त्याचे अनुकरण होणे आवश्यक असल्याचे मत कडलग यांनी व्यक्त केले.

प्राचार्य बनकर यांनी कार्यक्रमाचे महत्व व उद्देश स्पष्ट केला. प्रा. तुपविहीरे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सचिन लगड यांनी केले तर आभार अण्णासाहेब धतुरे यांनी मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 926
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवड

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर नगरपरिषद क्षेत्रासाठीच्या पथ विक्रेता तक्रार निवारण व…

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.