Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नव्या पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलात केले मोठे फेरबदल, अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याचे गॅझेट बाहेर

June 11, 2026

संगमनेर नजीकच्या आढा ओढ्यात अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू!

June 11, 2026

सराईत गुन्हेगार राहुल सोनवणे स्थानबद्ध; ‘एमपीडीए’ अंतर्गत संगमनेर पोलिसांची मोठी कारवाई

June 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात साकारणार डॉ. अमोल कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजी महानाट्य! महानाट्यात स्थानिक कलाकारांना काम करण्याची संधी… गुरुवारी (ता. २५) होणार ऑडिशन
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरात साकारणार डॉ. अमोल कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजी महानाट्य! महानाट्यात स्थानिक कलाकारांना काम करण्याची संधी… गुरुवारी (ता. २५) होणार ऑडिशन

जाणता राजा पाठोपाठ दुसरे महानाट्य संगमनेरमध्ये साकारणार
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 24, 2024Updated:January 24, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते, माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त जाणता राजा मैदानावर ४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेले “शिवपुत्र संभाजी” हे महानाट्य सादर होणार असून या महानाट्यात स्थानिक कलावंतांना संधी मिळणार आहे. यासाठी इच्छुक कलाकारांची ऑडिशन गुरुवारी (ता.२५) सकाळी १० वाजता शॅम्प्रो येथे होणार आहे

डॉ. अमोल कोल्हे अभिनित आणि महेंद्र महाडिक लिखित दिग्दर्शित “शिवपुत्र संभाजी”हे महानाट्य ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान दररोज सायंकाळी ६ वाजता शहरातील जाणता राजा मैदानावर सादर होणार आहे.

या महानाट्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे हे संभाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत असून महाराणी येसूबाईच्या भूमिकेत स्नेहलता वसईकर, अनाजी पंतांच्या भूमिकेत महेश कोकाटे, कवी कलशांच्या भूमिकेत अजय तकपिरे, सेनापती हंबीररावच्या भूमिकेत रमेश रोकडे तर दिलेरखान आणि मुकर्रबखानाच्या दुहेरी भूमिकेत विश्वजीत फडकेंसोबत अनेक सिनेकलावंतांचा सहभाग असणार आहे.

तडाखेबाज संवाद, १२० फुटी भव्यदिव्य किल्ल्याचा रंगमंच, खरी खुरी लढाई, हत्ती,घोडे आणि बैलगाड्यांचा वापर, २६ फुटी जहाजावरून जंजिरा मोहीम, चित्तथरारक घोडेस्वारी, संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर सोबत १५० पेक्षा जास्त कलाकारांचा सहभाग या महानाट्यात आहे.

Advt

या महानाट्यात स्थानिक कलाकारांना देखील काम करण्याची संधी मिळणार आहे. या सर्वांची ऑडिशन गुरुवारी सकाळी १० वाजता एसएमबीटी डेंटल कॉलेजसमोर शॅम्प्रो बिल्डिंग येथे होणार आहे.

सहभागासाठी इच्छुकांनी पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात गौरव समिती व अमृत उद्योग समूहाच्यावतीने करण्यात आले आहे. रामदास तांबडे (९९६००४२३७४), अभिजित पवार (९९७५२६४७७२) व जयेंद्र दुधे (९७३०४६८४८४)

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 610
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर नजीकच्या आढा ओढ्यात अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू!

June 11, 2026

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

नव्या पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलात केले मोठे फेरबदल, अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याचे गॅझेट बाहेर

By अनंत पांगारकरJune 11, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात गुरुवारी (दि. ११ जून) मोठे…

संगमनेर नजीकच्या आढा ओढ्यात अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू!

June 11, 2026

सराईत गुन्हेगार राहुल सोनवणे स्थानबद्ध; ‘एमपीडीए’ अंतर्गत संगमनेर पोलिसांची मोठी कारवाई

June 11, 2026

आयुष्याचा उत्सव साजरा करता आला पाहिजे : निवृत्त आयएएस अधिकारी इंद्रजीत देशमुख

June 11, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.