Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा एकदा लहान मुलाचा मृत्यू; दहा दिवसातील दुसरी घटना
महाराष्ट्र संवाद विशेष

बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा एकदा लहान मुलाचा मृत्यू; दहा दिवसातील दुसरी घटना

बिबट्याच्या उपद्रवामुळे नागरिक चिंतेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/01/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

बिबट्याच्या हल्ल्यात दहा दिवसांपूर्वी नऊ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही घटना संगमनेर राहता तालुक्याच्या सीमेवर घडल्या.

हर्षल राहुल मोरे (रा. सादतपूर) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. दहा दिवसांपूर्वी लोणी येथे प्रवरा रुग्णालयासमोरील भर लोकवस्तीत असलेल्या गोसावी वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात अथर्व प्रवीण लहामगे या नववर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता.

याच घटनेची पुनरावृत्ती गुरुवारी पुन्हा झाल्याचे दिसून आले. लोणीपासून जवळच असलेल्या सादतपूर येथे गुरुवारी सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास गोरे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पाच वर्षीय हर्षल राहुल गोरे याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

घराकडे परतत असताना जवळच्या गिन्नी गवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने हर्षल वर झडप घालत त्याला गिन्नी गवतामध्ये ओढून नेले. ही घटना बघून त्याचा भाऊ वाघ-वाघ ओरडत घराकडे पळाला. त्यामुळे वस्तीवरील सर्व लोक गवताकडे एकच गलका करत पळत सुटले. त्यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली.

जखमी अवस्थेतच हर्षल याला उपचारासाठी लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या दहा दिवसाच्या अंतरात सलग घडलेल्या या दोन घटनांमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advt

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी या परिसरात वनविभागाने जवळपास पंधरा पिंजरे लावले आहेत. प्रवरानगर पाथरी रोडवरील थेटे वस्तीवर लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला हा अपवाद वगळता परिसरात बिबट्यांचा संचार सुरूच असल्याचे यातून दिसून आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,351
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहर पोलीस…

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.