Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सामाजिक सुरक्षेचे योजनारुपी कवच तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील: पालकमंत्री विखे पाटील
महाराष्ट्र संवाद विशेष

सामाजिक सुरक्षेचे योजनारुपी कवच तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील: पालकमंत्री विखे पाटील

पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/01/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर – देशाच्या प्रगतीचा रथ सर्वसामान्य व्यक्तींच्या योगदानामुळेच पुढे जात आहे. समाजातील शेवटच्या घटकाचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी सामाजिक सुरक्षेचे योजनारुपी कवच तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनामार्फत यशस्वी प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकचे आयुक्त डॉ. पंकज जावळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री विखे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आज विविध क्षेत्रात प्रगती करत आहे. ग्रामीण व शहरी विषमता दुर करत एक विकसनशील राष्ट्र म्हणून भारत देशाची प्रतिमा जगात उंचावत आहे. काळानुरूप देशाच्या विकास प्रक्रियेची गती वाढत असताना २०४७ मधील विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रगतीचे वेगवेगळे टप्पे आपण साध्य करत आहोत. जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश बनविण्यासाठी आपल्या सर्वांच्या प्रयत्न आणि योगदानाची गरज आहे.

देशाच्या विकासाचे नवे स्वप्न प्रत्यक्ष साकार करताना देशातील युवा पिढीला केंद्रीभूत मानूनच निर्णय प्रक्रिया होत असल्याचे आपण पहात आहोत. युवाशक्तीच्या उर्जेला विधायक आणि रचनात्मक दिशेने पुढे नेण्याची गरज आहे. लोकसहभागातून विकासाचे व्यवस्थापन करण्याचा संकल्प करून प्रत्येक गाव आणि शहर सुविधांनी परिपूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, विद्यार्थी यांच्या प्रश्नांना प्राधान्य योजनांची गतीने अंमलबजावणी सुरू आहे.

राज्य शासनाने एक रुपयात सुरू केलेली पीकविमा योजना, केंद्र व राज्य शासनाच्या भागीदारीतून सुरू असलेले जलजीवन मिशन, आयुष्यमान भारत योजना, आनंदाचा शिधा उपक्रम सामाजिक बांधिलकीने राबविण्यात येत असून दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान देण्याचा तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून ११ हजार ६७३ शेतकऱ्यांना एक कोटी रुपयांच्या चारापीक बियाण्यांचे वाटप करण्यात येऊन १ लक्ष ८५ हजार मे. टन चारा उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. शासन आपल्या दारी आणि विकसित भारत संकल्प यात्रा हे उपक्रम शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरले असून यातून शासनाच्या योजना गावागावात पोहोचून नागरिकांना याचा लाभ मिळाला.

युवकांच्या रोजगाराच्यादृष्टीने अहमदनगर व शिर्डी येथे औद्योगिक वसाहत उभारणीसाठी जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. या वसाहती रोजगार उपलब्धतेसाठी महत्त्वपूर्ण ठरतील. कौशल्यावर आधारित शिक्षणाला प्राधान्य देत उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माणासाठी कौशल्य विकासाचा विशेष कार्यक्रम जिल्ह्यात हाती घेण्यात आला आहे. याद्वारे प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्धतेबाबत युवकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

जिल्ह्यातील तीर्थक्षेत्राचा विकास हा प्राधान्यक्रम ठरला असून या भागाचा विकास झाला तर परिसरातील बाजारपेठ विकसित होण्यास मोठी मदत होणार आहे. यासाठी ६५० कोटी रुपयांचा जिल्हा पर्यटन आराखडा, ९५ कोटी रुपयांचा किल्ला संवर्धन आराखडा, २५ कोटी रुपयांचा क्रीडा विकास आराखडा, नेवासा येथे ज्ञानेश्वर सृष्टी निर्माण करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. विकासातून तयार होणारी व्यवस्था रोजगार उपलब्धतेचा शाश्वत आधार ठरेल असेही विखे यांनी सांगितले.

Advt

मंत्री विखेंनी ‘यांचा’ केला सन्मान…

ध्वजदिन निधी संकलनाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे, मुंबई-पुणे मॅरॉथॉन स्पर्धेत यशस्वी कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाच्या जिल्हास्तरीय विजेत्यांचा, महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांचा, शहीद जवानांच्या वीर पत्नींचा सन्मान, कुटुंबीयांना मदतीचे धनादेश आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे पारितोषिक वितरण पालकमंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 879
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.