Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » औद्योगिक प्रगतीत सुरक्षा रक्षकांची भूमिका महत्त्वाची – हर्षवर्धन मालपाणी
महाराष्ट्र संवाद विशेष

औद्योगिक प्रगतीत सुरक्षा रक्षकांची भूमिका महत्त्वाची – हर्षवर्धन मालपाणी

७५ वा प्रजासत्ताक दिन मालपाणी उद्योग समूहात उत्साहात!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/01/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – ”औद्योगिक प्रगतीत सुरक्षा रक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जिथे सुरक्षितता तिथे प्रगती हे औद्योगिक प्रगतीचे सूत्र आहे” असे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक हर्षवर्धन मालपाणी यांनी येथे केले.

७५ वा प्रजासत्ताक दिन मालपाणी उद्योग समूहात उत्साहात साजरा करण्यात आला. मालपाणी इस्टेट येथे हर्षवर्धन मालपाणी व इशिता मालपाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मालपाणी यांनी वरील उद्गार काढले. यावेळी व्यासपीठावर व्यवस्थापक रमेश घोलप, मानव संसाधन विभाग व्यवस्थापक शिवाजी आहेर, कामगार नेते माधव नेहे, प्रदीप कानवडे, रवींद्र कानडे, देवदत्त सोमवंशी, विशाल वाजपेयी आदी उपस्थित होते.

मालपाणी म्हणाले, आपल्या देशाची प्रगती खूप झपाट्याने होत असून आपल्यावर दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटनच्या पुढे आपल्या अर्थव्यवस्थेने झेप घेतली आहे. येत्या काळात भारताचा संपूर्ण जगावर प्रचंड मोठा प्रभाव पडणार असून एक सामर्थ्यवान महाशक्ती आणि महागुरू होण्याच्या दिशेने देशाची वाटचाल आत्मविश्वासाने सुरु आहे.

मालपाणी यांचा सत्कार जमादार तिलाराम रावत यांच्या हस्ते तर इशिता यांचा सत्कार जमादार भीमसिंग गोरखा यांच्या हस्ते करण्यात आला. सुरक्षा विभागाचे प्रमुख भारत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व ऋषिकेश आप्रे यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा विभागातील जवानांनी घोष पथकासह राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन अप्रतिम व दिमाखदार पथसंचलन सादर करताच त्यास उपस्थितांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट करून प्रतिसाद दिला.

मागील वर्षभरात सापडलेल्या अनेक मौल्यवान गोष्टी प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल सुरक्षा विभागातील सुनील पानसरे, प्रकाश थोरात, सागर कानडे, राजू शेटे, पांडुरंग वामन या जवानांना तर शिस्तबद्ध पथ संचलनाचे नेतृत्व केल्याबद्दल ऋषिकेश आप्रे यांना भेटवस्तू देऊन मालपाणी दांपत्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कामगार नेते माधव नेहे यांनी देखील यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी मुरारी देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन तीलाराम रावत यांनी केले.

Advt

मालपाणी उद्योग समूहातील राहूल शेरमाळे, मंगेश उनवणे, राम पाटसकर, प्रकाश शेराल, संतोष कनोजे, संतोष राऊत, राम वामन, विनायक भोईर, किशोर वडनेरे, हेमंत घोडेकर, भगवान पलोड, यांच्यासह अनेक विभागांचे प्रमुख व स्टाफ सहकारी कामगार बंधू भगिनी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 679
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहर पोलीस…

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.