संगमनेर – संगमनेरच्या श्री ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रिय शिक्षक प्राध्यापक सचिन पठारे यांना पीएचडी पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रा. पठारे यांनी एम.ए. राज्यशास्त्र, एल.एल.एम. नेट-जे.आर.एफ असे शिक्षण घेतलेले आहे. श्री ओंकारनाथ मालपाणी महाविद्यालयात विधी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. छत्रपती संभाजी नगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने प्राध्यापक पठारे यांना ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.
“भारताच्या राज्यघटनेतील सुधारणेच्या अधिकारांचा गैरवापर याभोवती असणारे गोधळाचे जाळे नवव्या परिशिष्टावर विशेष भर देणारा एक चिकित्सक अभ्यास” या विधी विषयात पठारे यांनी प्रा. साधना पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला प्रबंध सादर केला होता. प्रा. पठारे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


