Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा संगमनेर दौरा अन् आमदार बाळासाहेब थोरातांचे धन्यवाद, माजी शहर प्रमुख अमर कतारींच्या नेतृत्वाखालील मोटरसायकल रॅली चर्चेत!
राजकारण

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा संगमनेर दौरा अन् आमदार बाळासाहेब थोरातांचे धन्यवाद, माजी शहर प्रमुख अमर कतारींच्या नेतृत्वाखालील मोटरसायकल रॅली चर्चेत!

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/02/2024Updated:15/02/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – अनंत पांगारकर

घरच्यांनीच केलेल्या गद्दारीमुळे सत्तेतून पायउतार व्हाव्या लागलेल्या माजी मुख्यमंत्री शिवसेना शहरप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बुधवारचा संगमनेरचा जनसंवाद दौरा त्यांच्या भाषणाने, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या जाहीररीत्या केलेल्या कौतुकाने चर्चेत आला असताना दुसरीकडे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी निघालेली मोटार सायकल रॅली चर्चेत आली आहे.

सत्तेतून पायउतार झाल्यानंतर शिवसेनेत अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. अनेक निष्ठावंत शिवसैनिकांना फोडत शिंदे गटाने त्यांच्यासाठी पायघड्या टाकल्या. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अनेक जण ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या सोबत जाण्याच्या तयारीत असतानाच शिवसेनेत पुन्हा एकदा पक्षांतर्गत घडामोडी घडल्या आणि उत्तर नगर जिल्ह्यातील कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आले. यात अनेक निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना डावलत मुख्यमंत्री शिंदे सोबत जाण्याच्या तयारीत असलेल्या अनेकांना अनपेक्षितपणे पदाची लॉटरी लागली. या घडामोडीत तब्बल एक तपाहून अधिक काळ शिवसेना शहर प्रमुख म्हणून काम करणारे अमर कतारी देखील पक्षीय राजकारणाचा बळी ठरले. त्यांनाही शहर प्रमुख पदावरून पायउतार व्हावे लागले.

कतारी यांच्यासह शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अनेक निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याने त्यांना विरोधी पक्षांकडून ऑफर यायला सुरुवात झाली. यातील काही जणांनी ठाकरेंची साथ सोडली असताना, शिवसेनेत पक्षांतर्गत पडझड सुरू असताना कतारी मात्र शहर प्रमुख पदावर पाणी पेरल्यानंतर देखील शिवसेनेसोबत म्हणजेच ठाकरेंसोबत कायम राहिले. राज्यातील मोठ्या असंतुलित राजकारणानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने मतदारांशी संवाद साधत आहे. ते मंगळवारी-बुधवारी दोन दिवसांच्या नगर जिल्हा दौऱ्यावर आले होते.

संगमनेरातदेखील नव्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती झाल्यानंतर शिवसेनेतील गटबाजी चर्चेत राहिली आहे. माजी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख असलेल्या ठाकरेंचा जनसंवाद बस स्थानकाबाहेर पार पडला. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या सहभाग, या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा संगमनेरात ताफा आल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती पासून कार्यक्रम स्थळापर्यंत माजी शहरप्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोटर सायकल रॅलीतील शिवसैनिकांच्या सहभागामुळे, व शेतकरी संगमनेरकरांच्या प्रतिसादामुळे यशस्वी झाल्याचे बोलले जाते.

ठाकरेंचे आगमन होताच रॅलीत सहभागी झालेल्या शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. रॅलीतील ठाकरेंच्या या सहभागामुळे शिवसैनिकांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली. कार्यक्रम स्थळी माजी शहरप्रमुख कतारी, माझे तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी ठाकरेंना चांदीची गदा देत त्यांचे स्वागत केले. कतारी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोटार सायकल रॅलीत युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित चव्हाण, दीपक साळुंखे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ठाकरे यांचा काँग्रेसच्यावतीनेही सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या भाषणादरम्यान ठाकरे यांनी आपल्याला अनपेक्षित पणे अचानक मुख्यमंत्री व्हावे लागल्याचे सांगत मी नवखा असताना सर्वात ज्येष्ठ असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी मी नवखा आहे, असं कधी मला भासू दिले नाही. मला सांभाळून घेतले. यासाठी मनाचा मोठेपणा, दिलदारपणा लागतो, असे स्पष्ट करत संगमनेरात आमदार थोरात यांना धन्यवाद दिले. त्यामुळे ठाकरे यांचा संगमनेर दौरा अधिक चर्चेत आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 5,382
अमर कतारी उद्धव ठाकरे जनसंवाद बाळासाहेब थोरात मोटार सायकल रॅली
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar06/09/20260

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त…

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.