Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एकल महिलांना सन्मान देण्याची आवश्यकता: कांचनताई थोरात
सामाजिक

एकल महिलांना सन्मान देण्याची आवश्यकता: कांचनताई थोरात

संगमनेर खुर्दमध्ये २०० एकल महिलांचा सत्कार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/02/2024Updated:16/02/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – महिला भगिनींचा सन्मान करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. दुर्दैवाने ज्या महिला भगिनींवर एकलपणाचे दुःख आले, त्या सर्वांना आधार देत त्यांना आदर व सन्मान देण्याचे आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई थोरात यांनी केले.

स्वर्गीय नानासाहेब गुंजाळ प्रतिष्ठानच्यावतीने संगमनेर खुर्दमध्ये श्रीमती रोहिणी गुंजाळ यांच्या पुढाकारातून एकल महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोनशे एकल महिलांना आवळा व जांभूळ वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी थोरात बोलत होत्या. रोहिणी गुंजाळ यांच्यासह सरपंच श्वेता मंडलीक, जयश्री शिंदे, रोहिणी कदम, स्वाती गोसावी, दिपाली गडगे, श्रीमती पवार मॅडम यांच्यासह सुमारे पाचशे महिला उपस्थित होत्या.

थोरात म्हणाल्या, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिलांच्या विकासासाठी मोठे योगदान दिले. हाच वारसा पुरोगामी महाराष्ट्र पुढे जपत असून एकल महिलांना सर्वांनी नेहमी सन्मान द्यावा. दुर्दैवाने त्यांच्यावर एकलपणा आला. त्यांना सर्व समारंभात सहभागी करून घ्या. अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता मानवता जपा. वारकरी संप्रदायाने सर्वधर्मसमभाव व समतेचा मंत्र दिला आहे. पुरोगामी विचारांमध्येही अंधश्रद्धेला थारा नाही. हाच विचार संगमनेर तालुक्यात जोपासला जात असून नानासाहेब गुंजाळ प्रतिष्ठानच्यावतीने महिला सबलीकरणासाठी आयोजित केले जाणारे उपक्रम स्तुत्य आहे.

रोहिणी गुंजाळ म्हणाल्या, आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कांचनताई थोरात व दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात सातत्याने महिला सबलीकरणाचे काम होत आहे. एकल महिलेला मोठे दुःख असून त्यांना प्रत्येकाने आधार द्यावा. प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात त्यांना सहभागी करून घ्याव. यासाठी जनजागृती म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी उपसरपंच गणेश शिंदे, सुभाष गुंजाळ, गुलाब शेख, रमेश सुपेकर, शिवाजी सातपुते, बाळकृष्ण गांडाळ, सविता हासे, शुभांगी गुंजाळ, चंद्रकला गुरव, ज्योती मांडेकर, वैशाली मांडेकर, स्मिता गुंजाळ, मेधा अभंग यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन कामिनी घोडेकर यांनी तर स्मिता गुंजाळ यांनी आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 734
एकल महिला कांचनताई थोरात रोहिणी गुंजाळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

By Annant Ppangarkar04/10/20260

बाळासाहेब घोडके- शिवसेना हे चार अक्षरी नाव उच्चारताच मनात एक झंझावात उभा राहतो. वंदनीय बाळासाहेब…

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.