Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पेमगिरीच्या ‘हेरिटेज वॉक’मधून उलगडला ऐतिहासिक वैभव; शहागड आणि महाकाय वटवृक्षाला अभ्यासकांची भेट
सामाजिक

पेमगिरीच्या ‘हेरिटेज वॉक’मधून उलगडला ऐतिहासिक वैभव; शहागड आणि महाकाय वटवृक्षाला अभ्यासकांची भेट

प्रत्येक ऐतिहासिक स्थळाचा इतिहास, वास्तुशैली आणि त्यामागील संदर्भ तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून अत्यंत रंजक पद्धतीने उलगडला जाणे हे या 'हेरिटेज वॉक'चे मुख्य वैशिष्ट्य ठरत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर:
अकोले व संगमनेर परिसरातील समृद्ध ऐतिहासिक वारसा जतन करून तो नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘हेरिटेज वॉक’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत रविवारी पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागड आणि महाकाय वटवृक्ष या ठिकाणी तिसऱ्या अभ्यास सहलीचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते.
सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयाचा इतिहास विभाग व जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम पार पडला. सकाळी संगमनेर बसस्थानकातून या अभ्यास सहलीला प्रारंभ झाला. पेमगिरी येथे पोहोचल्यानंतर सहभागी सदस्यांनी शहागडाचा इतिहास, तेथील स्थापत्यवैशिष्ट्ये आणि ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले. यावेळी इंजिनिअर नानासाहेब खर्डे यांनी प्राचीन ते मध्ययुगीन इतिहासाचा आढावा घेत सातवाहनकालीन पाण्याच्या टाक्यांबाबत अभ्यासपूर्ण माहिती दिली.
कार्यक्रमाचे संयोजक प्रा. विठ्ठलराव शेवाळे यांनी शहाजीराजे भोसले यांच्या थोर कार्याचा विशेष उल्लेख केला. निजामशाहीचा वारसदार मुर्तजा याला जीवधन किल्ल्यावरील नजरकैदेतून मुक्त करून शहाजीराजांनी पेमगडावर आणले आणि त्याला गादीवर बसवून स्वतः सन १६३३ ते १६३६ या काळात कारभार सांभाळला, अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यांनी मांडली. स्वराज्याच्या संकल्पनेची बीजे याच भूमीत रुजली असून छत्रपती शिवरायांमध्ये स्वराज्याचे बीज रोवण्याचे काम शहाजीराजांनी केले आणि राजमाता जिजाबाईंनी त्याला खतपाणी घातले, असे गौरवोद्गार प्रा. शेवाळे यांनी काढले.
यानंतर सर्व सदस्यांनी पेमगिरी येथील जगप्रसिद्ध महाकाय वटवृक्षाला भेट दिली. वाल्मीक कोल्हे आणि डॉ. भुतांबरे यांच्या मालकीच्या शेतातील या वटवृक्षाचा सुमारे अडीच ते पावणेतीन एकरांपर्यंत झालेला विस्तार आणि ‘जाखमत बाबा’शी संबंधित लोककथा यांची रंजक माहिती प्रा. शेवाळे यांनी सर्वांना दिली. त्यानंतर सर्वांनी गावातील प्राचीन मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या सहलीदरम्यान वाल्मीक कोल्हे परिवारातर्फे अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती, तर दुपारनंतर सर्व सदस्य संगमनेर येथे परतले.
प्रकल्प प्रमुख रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. तर डॉ. माणिकराव शेवाळे यांनी स्कूलबसची सुविधा उपलब्ध करून दिली. या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश आरोटे, डॉ. उमा कुलकर्णी, सतीश मालवणकर, ॲड. ज्ञानदेव सहाणे यांच्यासह इतिहास विभागातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रत्येक ऐतिहासिक स्थळाचा इतिहास, वास्तुशैली आणि त्यामागील संदर्भ तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून अत्यंत रंजक पद्धतीने उलगडला जाणे हे या ‘हेरिटेज वॉक’चे मुख्य वैशिष्ट्य ठरत आहे. त्यामुळेच या उपक्रमात युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग वाढत असून, हा अनुभव अत्यंत माहितीपूर्ण, प्रेरणादायी आणि आनंददायी ठरत असल्याची भावना सहभागी सदस्यांनी व्यक्त केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 570
पेमगिरी महाकाय वटवृक्ष शहागड हेरिटेज वॉक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.