Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026

शनिवार, १ ऑगस्ट २०२६ — आजचा तुमचा दिवस कसा असेल

August 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सराईत गुन्हेगार राहुल सोनवणे स्थानबद्ध; ‘एमपीडीए’ अंतर्गत संगमनेर पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हेगारी

सराईत गुन्हेगार राहुल सोनवणे स्थानबद्ध; ‘एमपीडीए’ अंतर्गत संगमनेर पोलिसांची मोठी कारवाई

सोनवणे याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मारहाण, लुटमार, जबरी चोरी आणि घातक शस्त्रांनी गंभीर मारहाण करणे यांसारखे तब्बल १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
​संगमनेर:
शहरात सातत्याने गंभीर गुन्हे करून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराविरुद्ध पोलीस प्रशासनाने अखेर ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली आहे. संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अकोले नाका परिसरात राहणाऱ्या राहुल भारत सोनवणे (वय २४ वर्षे) या धोकादायक व्यक्तीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले असून, त्याची रवानगी नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
​याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल सोनवणे याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मारहाण, लुटमार, जबरी चोरी आणि घातक शस्त्रांनी गंभीर मारहाण करणे यांसारखे तब्बल १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस प्रशासनाने यापूर्वी त्याच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती, तसेच त्याला हद्दपार करण्याचे प्रस्तावही सादर करण्यात आले होते. मात्र, या सर्व कारवायांना न जुमानता त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नाही. उलट त्याचे मनोबल वाढल्याने तो पुन्हा गुन्हे करण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्याच्या या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे संगमनेर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
​या गंभीर परिस्थितीची दखल घेत, अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समिर बारवकर यांनी या गुन्हेगाराचा ‘एमपीडीए’ प्रस्ताव तयार केला. महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या अधिनियम १९८१ (सुधारणा अधिनियम २०१८) मधील कलम ३(३) अन्वये “धोकादायक व्यक्ती” या मथळ्याखाली हा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे पाठवण्यात आला होता.
​आरोपीची गोळा केलेली माहिती आणि त्याचा गुन्हेगारी अभिलेख तपासून, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. राहुल सोनवणे याच्याविरुद्धच्या एक वर्षाच्या स्थानबद्धतेस शासनाची मान्यता मिळण्याबाबतचा अहवाल मुंबई येथील गृह विभागाच्या (विशेष) अप्पर मुख्य सचिवांना सादर करण्यात आला आहे. मंजुरी मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी राहुल सोनवणे याला ताब्यात घेऊन त्याची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.
​ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक समिर बारवकर यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब सातपुते, अतुल उंडे, विजय खुळे, राहुल पांडे, सागर नागरे, विजय आगलावे आणि संदिप कोंदे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. दरम्यान, संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इतरही सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित केली जात असून, त्यांच्याविरुद्धही अशाच प्रकारची कठोर कायदेशीर कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,143
एमपीडीए कायदा गुन्हेगारी राहुल सोनवणे संगमनेर शहर पोलीस स्थानबद्ध कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

By अनंत पांगारकरAugust 1, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: दलित, शोषितांचा आपल्या साहित्यातून आवाज बुलंद करणारे आणि हक्कांसाठी लढा…

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026

शनिवार, १ ऑगस्ट २०२६ — आजचा तुमचा दिवस कसा असेल

August 1, 2026

नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून जनआंदोलनाची हाक

July 31, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.