Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विशेष लेख —- दुःख माणसाच्या धैर्याची…
Uncategorized

विशेष लेख —- दुःख माणसाच्या धैर्याची…

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/02/2024No Comments5 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अजय अनिता दोघे ही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोघेही हुषार. त्यामुळे त्यांना लगेचच चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. हेही त्यांच्या लक्षात आले की They are in love. तेंव्हा त्यांनी लग्न करायचे ठरविले. दोघांच्या घरी एकमेकांची माहिती होतीच, त्यामुळे लगेचच दोन्ही घरचे भेटले व लग्न ठरलं.
अनिताने मात्र सर्वांसमोर एक अट ठेवली. ती म्हणाली, मी एकत्र कुटुंबात राहणार नाही. हे ऐकून अजय व त्याचे आई-वडील तर चकित झालेच, बरोबर अनिताचे आई-वडील पण अनिताकडे आश्चर्याने बघू लागले. लगेचच अजयचे बाबा म्हणाले, ठीक आहे. मला अनिताचे कौतुक वाटतं की, तिने हे लग्नाआधी सर्वांसमोर सांगितले. थोडा वेळ द्या आम्हाला. आपण उद्या पुन्हा भेटू व पूढचे ठरवू, असं म्हणून बाबांनी परिस्थिती सांभाळुन घेतली.
घरी येताना सर्व शांत होते. अजय व आई खूप डिस्टर्ब आहे हे बाबांच्या लक्षात आले. घरी आल्यावर बाबा म्हणाले, अरे तुम्ही वेगळे राहिला तर आम्हाला काही हरकत नाही. जवळ राहिलं म्हणजेच प्रेम असत का? अनिता चांगली मुलगी आहे. तुम्ही दोघे एकमेकांना मागच्या पाच वर्षांपासून ओळखता. चांगली शिकलेली आहे. दिसायला सुंदर आहे, मुख्य म्हणजे तुला आवडते ना. मग आम्हाला काही हरकत नाही. आजी मात्र नाखुश होत्या. त्यांनी एकुलत्या एक सुनेबद्दल बघीतलेली सर्व स्वप्न एका क्षणात संपल्यासारखी त्यांना वाटलं. अजय फक्त ऐकत होता.
दुसऱ्यां दिवशी अजयने अनिताला समजविण्याचा खूप प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. बाबां मात्र आईला समजविण्यात यशस्वी झाले. मुलांच्या सुखासाठी व आनंदासाठी आई-वडील नेहमीच कोणतेही निर्णय लवकर घेतात. कोणत्याही प्रकारची तडजोड करायला ते लगेच तयारी दाखवतात.
आता अजय-अनिताचा संसार सुरू झाला. आई बाबांनी स्वतः लक्ष देऊन त्यांच्या घरातील सर्व सामान अनिताच्या पसंतीने घेतले. अगदी चमच्यापासून फ्रीजपर्यंत सर्व वस्तू घरात तयार होत्या.
दोघांची नोकरी होती. अजय आठवड्यातून एकदा घरी यायचा. येताना फोन करून विचारून पिशव्या भरभरून तो आई-बाबांकरिता त्यांची औषधे, फळ, भाज्या आणून देत असे. बाबा म्हणायचे, अरे, मग मी काय करू? आम्हाला बाहेर जायचे कारणच मिळत नाही.
तेंव्हा अजय हसून म्हणत, बाबा तुम्ही फक्त आईला घेऊन फिरायला जात जा. अनिता मात्र काही खास कारण असेल तरच यायची. आईला त्याचे खूप वाईट वाटत असे. बाबांना याची जाणीव होती. ते खंबीर होते. बायकोला सांभाळायची जबाबदारी पण माझीच आहे. हेही बाबांना माहीत होते. बाबा म्हणजे एक प्रसन्न चित्त व्यक्तिमत्त्व. नेहमीच वेगळ्या आयडिया असतात त्यांच्या जवळ. आणि आपली आयडिया कशी छान आहे हे त्यांना पटवून पण देता येत.
दोघांची गाडी हळूहळू रुळावर येऊ लागली. वरवरून आई खूष आहेत, असं दाखवत जरी असल्या तरी कुठे तरी त्यांचे मन दुखावले होते. अजय आज येणार हे कळलं की आई अगदी तयारीला लागायच्या. बाबा लिस्ट घेऊन आईंनी सांगितलेले सर्व साहित्य आणून द्यायचे. आई वेगवेगळे पदार्थ तर करायच्याच. बरोबर त्यादिवशीचा डबा म्हणून दोन तीन भाज्या, पोळ्या पण द्यायच्या. अरे, तेवढंच अनिताला काम कमी होईल. असं म्हणायच्या. नोकरी करुन घरातील सर्व काम करताना ती थकत असेल असं म्हणत.
अनिता मात्र आपल्या विश्वात अगदी दंग होती, रमलेली होती. आता तर प्रोजेक्ट लीडर होती. त्यामुळे आनंदात होती. पण वाढत्या कामाबरोबरच तिचा स्ट्रेसही वाढत होता.
कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी कधी कधी काही कार्यक्रम आयोजित होत असतात. आजचा कार्यक्रम ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’वर होता. अनिता या कार्यक्रमात सहभागी झाली. वक्ता अर्थातच तयारीने आलेला होता. ‘what is stress?’ त्यांचे शारीरिक व‌ मानसिक कसे परिणाम होतात. stress management करिता काय काय आपण करू शकतो? त्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. योगा करणे नियमित व्यायाम करणे का गरजेचे आहे हे त्यांनी या कार्यक्रमादरम्यान कर्मचाऱ्यांना सांगितले.
आपले भाषण संपवताना ते म्हणाले, तुम्ही सर्व शिकलेले तरूण आहात. पैसा, पद, बढती फक्त याचाच विचार करू नका? कुठे तरी फुल स्टॉप लावायला शिका. कुठे थांबायचे? हे ठरवायला शिका. आनंद केंव्हा घेणार आयुष्यात? आनंद घेणे ही वर्तमान काळातील गोष्ट असते. भविष्यात घेऊ म्हणून पूढे ढकलायची गोष्ट नव्हे.
आपल्या जीवनात प्राधान्यक्रम ठरवायला शिका. पैसा आणि फॅमिली हे दोन्ही आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. फ्रीडम, प्रायव्हसीच्या नावाखाली आपण आपल्या माणसांपासून दूर तर होत नाही ना याचेही भान ठेवा. एकटेपणा हे सुद्धा स्ट्रेसचे एक मोठे कारण आहे. जेंव्हा व्यक्त व्हायला कोणी विश्वासाचे मिळत नाही, तेंव्हा स्ट्रेस एकत्र होत जातो. तुमच्या या नवीन कल्चरमधे नोकरी सोडणे, बदलणे किंवा नोकरी जाणे, या सहज घडणाऱ्या गोष्टी आहेत.
त्यामुळे अस्थिरता व अनिश्चितता या दोन्ही तलवारी सतत टांगलेल्या असतात तुमच्या आयुष्यात. निश्चित काही गोष्ट असेल तर ती तुमची फॅमिली आहे. तो तुमचा आनंद आहे. तेंव्हा विचार करा. तुम्ही त्या सर्वांबरोबर जीवापाड तडजोड करता. जे निश्चित नाही. मग परिवार बरोबर का नाही? ती तर जास्त सोपी व सहज गोष्ट आहे. ओझ आणि मन हलकं करायला परिवारासारखी दुसरी सेफ जागा नसते. तुमचे कौतुक करायला व तुम्हाला, तुमच्या मुलांना सांभाळायलाही कोणी तरी पाहिजेच ना. माझ्या भाषणात हा उल्लेख मी सर्वात शेवटी जरी केला असला, तरी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा.अचानक अनिताच्या डोळ्यासमोर अजयच्या आई बाबांचा चेहरा आला. त्यांनी पाठविलेले डबे, वेळोवेळी घेतलेली काळजी तिला आठवली. अनिता घरी आली ती वेगळ्याच विचारात. येताना तिने बाबांना फोन केला. अजयला पण सुट्टी घ्यायला सांगितले. अनिता-अजय उद्या घरी येतायेत. बाबांनी आईंना सांगितले. दोघांच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह होते. मिश्रीत भाव होते. बाबा म्हणाले, अग उद्या अनिताच्या आवडीचा स्वयंपाक कर.
दुसऱ्या दिवशी अजय अनिता घरी आले. अनिताने आई बाबांना सांगितले, आम्ही येथे तुमच्या बरोबर रहायला येणार आहोत नेहमीकरिता. अजय, आई बाबा पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाले. पण यावेळी मिळणारा धक्का सुखद होता.
बाबा म्हणाले… “Yes, you are always welcome.” फक्त मला पंधरा दिवस द्या. तुमची खोली व्यवस्थित करायला. आईने बाबांकडे बघीतले, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व बाबांबद्दलचा अभिमान स्पष्ट दिसत होता.••• .
“दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेत असत”. ‘संयम आणि माफ करायची ताकद मनुष्यात असली की सर्व साध्य होते. इतरांकडून कमीत कमी अपेक्षा व स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोडी या दोन गोष्टी प्रत्येकाचे जीवन आनंदी व यशस्वी बनवू शकतात. “चुकीने चूकीच्या मार्गावर गेले तर काही हरकत नाही. पण चूक लक्षात येताच मार्ग बदलायची इच्छा व हिम्मत दाखविणे हे कौतुकास्पद आहे”.
संध्या बेडेकर ( साभार – समाज माध्यम)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 364
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar03/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी येथे मुंबई पोलिसाच्या शेतात वाळत घातलेल्या बाजरीच्या कणसांवर…

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.