Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कडलग इन्व्हेस्टमेंटचे सुनील कडलग व साईनाथ उद्योगचे सुदीप वाकळे यांना राष्ट्रीय गुणवत्ता पारितोषिक
सामाजिक

कडलग इन्व्हेस्टमेंटचे सुनील कडलग व साईनाथ उद्योगचे सुदीप वाकळे यांना राष्ट्रीय गुणवत्ता पारितोषिक

नवी दिल्लीत झाला "इंडियन ग्लोरी अवॉर्ड्स २०२४" समारंभ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/02/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि.२८
येथील कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनील कडलग यांना समाजात अर्थसाक्षरता निर्माण करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल तर साईनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील व्यवसायात नाविन्यपूर्ण कामगिरीबद्दल सुदीप वाकळे यांना प्रतिष्ठेच्या “इंडियन ग्लोरी अवॉर्ड्स” या राष्ट्रीय गुणवत्ता पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे.
नवी दिल्ली येथे आयोजित व्यावसायिक व शैक्षणिक शिखर परिषदेत सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश डॉ. के. जी. बालकृष्णन, माजी क्रिकेटपटू मदनलाल, भारतीय उद्योग महासंघाच्या पहिल्या महिला आणि माजी उपमहासंचालक मनिषा रॉय, संस्थापक अध्यक्ष आणि कौन्सिलचे संचालक जॉर्ज कोचुपुरकल यांच्या हस्ते कडलग व वाकळे यांना इंडियन ग्लोरी अवॉर्ड्स राष्ट्रीय गुणवत्ता पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
ग्लोबल चेंबर ऑफ कंजूमर राइट्स व काईटस् क्राफ्ट प्रोडक्शन या संस्थेतर्फे आयोजित इंडियन ग्लोरी अवॉर्ड्स २०२४ साठी आपापल्या व्यवसायातील गुणवत्ता, नाविन्यपूर्णता, अद्वितीय व प्रेरणादायी योगदानाबद्दल संपूर्ण भारतातून पारितोषिकांसाठी आर्थिक योजनाकार, म्युच्युअल फंड वितरक व कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक, विमा आणि गुंतवणूक सल्लागार सुनील कडलग यांनी आपल्या अद्वितीय समर्पणाने, म्युच्युअल फंड वितरण, जीवन विमा व आरोग्य विमा या क्षेत्राच्या माध्यमातून समाजामध्ये अर्थसाक्षरता निर्माण करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल तर कृषी, उद्योग संवर्धनात साईनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाला विशिष्ट उंची प्राप्त करून दिल्याबद्दल सुदीप वाकळे यांच्यासह दवा इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजित पॉल, कोटा इंटरनॅशनलच्या अध्यक्ष सुशीला सुकुमारन, जागतिक अभ्यासासाठी मंच आंतरराष्ट्रीय प्रभावकार संस्थाचे सल्लागार मेजर जनरल संजय सोल, भारत, फ्रेंच आणि यूएसएचे अधिकृत जागतिक शांतता राजदूत डॉ. संग्रामसिंग माळी, युनायटेड नेशन्स महिला प्रादेशिक कार्यालय आणि नीती आयोग यांच्या भारत आंतरराष्ट्रीय महिला उद्योजकीय आव्हानेच्या अधिकारी अनु चढ्ढा यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कडलग यांचा म्युच्युअल फंड वितरणाच्या माध्यमातून भारतातील निवडक गुंतवणूक सल्लागारांमध्ये समावेश झाला आहे. अतिशय ग्रामीण भागात सुनील कडलग हे १०० कोटींच्या संपत्तीचे व्यवस्थापन करत असून त्यांनी जीवन विमा, आरोग्य विम्याव्दारे कोविड कालावधीच्या दरम्यान अनेक कुटुंबांना मृत्यू दावे व आरोग्य विमा दावे प्राप्त करून दिलेले आहेत. समाजात अर्थसाक्षरता निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध वृत्तपत्रांमधून लिखाण केले आहे. महाराष्ट्रभरातील शाळा, महाविद्यालयांमधून, विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून त्यांनी गोष्ट पैशा-पाण्याची, नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन, आर्थिक नियोजनातून आर्थिक स्वातंत्र्याकडे आदी विषयांवर व्याख्याने दिली आहेत. जर्मनी, इटली, लंडन, ऑस्ट्रेलिया, स्विझर्लंड, पॅरिस आदी ठिकाणी कडलग यांना आर्थिक नियोजन क्षेत्रातील जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित पारितोषिकाने वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश डॉ. के. जी. बालकृष्णन म्हणाले, इंडियन ग्लोरी अवॉर्ड्स २०२४ चे राष्ट्रीय गुणवत्ता पारितोषिक हे समाजातील वेगळपण, समर्पित वृत्ती आणि दृष्टिकोनाचं सामर्थ्य असलेल्या व्यक्तींच्या आत्मविश्वासाचे महाचिन्ह आहे. प्रत्येक व्यवसाय हा भारताला सामर्थ्यसंपन्न बनवण्यासाठी, एका विशिष्ट उंचीपर्यंत पोहोचवण्यासाठी व व्यवसायाच्या माध्यमातून समाजाला आत्मनिर्भर करण्यासाठी पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आपले योगदान दिले आहे. अशा व्यक्तींच्या सकारात्मक ऊर्जेतूनच चांगल्या समाजाची निर्मिती होते. म्हणून पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी समाजाप्रती नेहमी संवेदनशील राहून गरजूंना मदत करून भारत सामर्थ्य संपन्न बनवला पाहिजे.
कडलग म्हणाले, समाजातील सामान्य व्यक्ती ही आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होऊ शकते. समाजातील प्रत्येक घटक आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्यासाठी आपण भविष्यातही आपण प्रेरणादायी योगदान देऊ.
वाकळे म्हणाले, कृषी क्षेत्रातील व्यवसायाच्या गुणवत्तेबद्दल इंडियन ग्लोरी अवॉर्ड्सचे राष्ट्रीय गुणवत्ता पारितोषिकाने जबाबदारी वाढली आहे. कृषी क्षेत्रात आणि कृषी व्यवसायात यापुढेही साईनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून गुणवत्ता व नाविन्यपूर्ण कार्य करू.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 821
इंडियन ग्लोरी अवॉर्ड्स २०२४ सुदीप वाकळे सुनील कडलग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.