Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

June 6, 2026

संगमनेर नगरपरिषदेचा दणका: भाजप नेत्याच्या मुलाविरुद्ध अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश

June 6, 2026

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: नाना पटोले
राजकारण

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: नाना पटोले

भारतीय जनता पक्षाने सुरु केलेल्या राजकारणामुळे सभागृहाचा आखाडा
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 1, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, दि. १ मार्च

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे व आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की झाली. महाराष्ट्राच्या विधिमंडळात असा प्रकार होणे चुकीचे आहे. भारतीय जनता पक्षाने सुरु केलेल्या राजकारणामुळे सभागृहाचा आखाडा झाला असून विधिमंडळाच्या लॉबीतच आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की, मारहाण करणे हे भूषणावह नाही तर महाराष्ट्राला लाज आणणारी घटना आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.आमदारांच्या धक्काबुक्की प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सत्ताधारी आमदारांची जनतेच्या मुलभूत प्रश्नापेक्षा स्वतःच्या, वैयक्तिक प्रश्नांसाठी कुरघोडी चाललेली आहे. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये मंत्र्यांवर खोक्यांचे आमदार तुटून पडतात हे खोक्याचे प्रकरण असून खोक्यामध्येच चालत राहणार, असे म्हणत या विधिमंडळात झालेल्या या घटनेचा तीव्र निषेध केला. आमदारांच्या धक्काबुक्कीचा मुद्दा विधान सभेतही उपस्थित करण्यात आला होता. धक्काबुक्कीची ही घटना बाहेर घडलेली नसून सभागृहाच्या लॉबितच घडलेली आहे, प्रकरण गंभीर असून तातडीने माहिती घेऊन यासंदर्भात योग्य ती कारवाई करावी असे नाना पटोले म्हणाले.
प्रश्नोत्तराचा तास का नाही?
अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास हा सदस्यांसाठी महत्वाचे आयुध आहे परंतु या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तासच ठेवलेला नाही. आपल्या मतदारंसघातील प्रश्न, समस्या मांडण्यासाठी प्रश्नोत्तराचा तास असतो. सदस्यांचा तो अधिकार आहे. सदस्यांच्या अधिकाराचे रक्षण करण्याची अध्यक्षांची जबाबदारी आहे. कोविड काळात अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवला होता परंतु आताही अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास ठेवण्यात आलेला नाही. सरकारने विधेयके मंजूर करून घेतली पण जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी सदस्यांना संधीच मिळाली नाही, असे नाना पटोले म्हणाले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 530
काँग्रेस नाना पटोले
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

By अनंत पांगारकरJune 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर न्यायालयाने एका पोक्सो कायद्या अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात…

संगमनेर नगरपरिषदेचा दणका: भाजप नेत्याच्या मुलाविरुद्ध अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश

June 6, 2026

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.