Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महायुती सरकारने सत्तेवर येताच दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठविल्याने रामेश्वर देवस्थान सुशोभीकरण व सुधारणेचा मार्ग मोकळा
राजकारण

महायुती सरकारने सत्तेवर येताच दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठविल्याने रामेश्वर देवस्थान सुशोभीकरण व सुधारणेचा मार्ग मोकळा

रामेश्वर देवस्थान सुशोभीकरण व सुधारणेचा मार्ग मोकळा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/03/2024Updated:06/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर दि. ६
मविआ सरकारच्या काळातील रामेश्वर देवस्थानच्या निधीला महायुती सरकारने सत्तेवर येताच दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठविल्याने रामेश्वर देवस्थान सुशोभीकरण व सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्यामुळे या कामाचे भूमिपूजन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजीत थोरात व डॉ. जयश्री थोरात यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावाच्या विविध विकास कामांसाठी मोठा निधी मिळाला. यात रामेश्वर देवस्थानच्या ६ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश होता.
राज्यात सत्तांतर होताच महायुती सरकारने या निधीला स्थगिती दिल्याने देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली होती. न्यायालयाने स्थगिती उठविल्यानंतर आधीच्या सहा कोटी रुपयांच्या निधीत आणखी एक कोटीचा निधी थोरात यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानंतर या ७ कोटीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामहरी कातोरे, उद्योजक बाळासाहेब देशमाने, कारखान्याचे संचालक अनिल काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनिल देशमुख, सरपंच उज्वला देशमाने, उपसरपंच संकेत वनवे, सुनील देशमुख, विजय कोल्हे, दत्ता कासार, राजेंद्र देशमुख, रावसाहेब डेरे व विश्वस्त मंडळासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, बाळासाहेब देशमाने आदींसह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.ही कामे होणार… या निधीमधून अकोले-संगमनेर मार्ग ते रामेश्वर देवस्थान रस्ता कॉंक्रिटीकरण, सभामंडप उभारणे, भोजनालयाचे विस्तारीकरण करणे, हॉल बांधकाम करणे, परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवणे, बाग बगीचा सुशोभीकरण आदी कामाचा समावेश आहे.
तांबे म्हणाले… काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील प्रत्येक वाडीवस्तीच्या विकासाकरता निधी मिळवला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये रामेश्वर देवस्थान परिसराच्या विकासासाठी त्यांनी पाच कोटी रुपयांचा निधी मिळवला होता. आता नव्याने पुन्हा एक कोटी रुपये निधी मिळवला असून या निधीमधून या परिसरात विविध विकास कामे होणार असल्याने हे तीर्थक्षेत्राबरोबर मोठे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या… रामेश्वर हे या परिसराचे नव्हे तर तालुक्याचे श्रद्धास्थान आहे. या देवस्थानच्या विकासासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने निधी मिळवला असून धांदरफळ परिसरात अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत.
इंद्रजीत थोरात म्हणाले… आमदार थोरात यांच्या माध्यमातून सातत्याने तालुक्यात विकास कामे होत आहेत. मात्र काही लोक विनाकारण काम नसताना श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न करतात.

वर्क ऑर्डरला स्टे देऊन सत्ताधारी भाजपकडून देवाच्या कामातही राजकारण…
काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये रामेश्वर देवस्थान परिसराच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. ३१ जानेवारी २२ रोजी या कामाची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र भाजप व पालकमंत्री यांच्या राजकारणातून या कामाच्या वर्क ऑर्डरला स्टे दिला गेला. कोर्टातून या कामाचा स्टे उठवला गेला असून पालकमंत्री व भाजपाने देवाच्या कामातही गलिच्छ राजकारण केले.
दत्ता कासार, रामेश्वर देवस्थानचे सचिव.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 702
न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची…

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.