Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धनुष्यबाण नसेल तर कमळाच्या चिन्हावर लढतो, पण उमेदवारी द्या; शिंदेंच्या १३ खासदारांचा उमेदवारीसाठी दबाव गट, मुख्यमंत्र्यांना साकडं!
राजकारण

धनुष्यबाण नसेल तर कमळाच्या चिन्हावर लढतो, पण उमेदवारी द्या; शिंदेंच्या १३ खासदारांचा उमेदवारीसाठी दबाव गट, मुख्यमंत्र्यांना साकडं!

शिंदे-पवार गटातील खासदार कमळाच्या चिन्हावर लढण्याचे संकेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

कोल्हापूर, दि. ७ मार्च

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बाहेर पडताना गद्दारीचा शिक्का माथी बसलेल्या मुख्यमंत्री शिंदे गटातील काही खासदारांचा पत्ता भाजप कट करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या खासदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून काहीही करा, पण उमेदवारी द्या, धनुष्यबाण मिळणार नसेल तर कमळावर लढू! असं साकडं या खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना घातल आहे.

या मागणीसाठी खासदारांनी दबाव गट तयार केला अजून दोन दिवसात ते एकत्रित भेटणार असल्याचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिले आहे. शिवसेना फुटीवेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील तेरा खासदार गेले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारी आणि भरपूर निधी असा शब्द त्यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचे अनेक खासदार सांगतात. आता मात्र यापैकी अनेकांची उमेदवारी कापली जाणार असल्याचे संकेत मिळत असल्याने हे सर्व खासदार एकत्रित आले असून उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांनी दबाव गट निर्माण केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने प्रत्येक मतदारसंघात अनेकदा सर्वेक्षण केले. यात बहुतांशी मतदारसंघात विद्यमान खासदारांविषयी नाराजी असल्याचे पुढे आले आहे. अनेक जण पराभूत होण्याचे संकेत मिळाल्याने त्या-त्या मतदारसंघात उमेदवार बदलाच्या भाजपाच्या हालचाली सुरू आहेत. शिंदे गटातील काही खासदार कमळाच्या चिन्हावर लढल्यास काय परिणाम होऊ शकतात याचा देखील अंदाज घेण्यात आला आहे. तेथेही फारसा समाधानकारक अहवाल मिळू शकला नसल्याने अनेकांची तिकिटे कापले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिंकणाऱ्याला उमेदवारी असा निर्णय मुख्यमंत्र्यांचीही अडचण झाली असून धनुष्यबाण मिळणार नसेल तर कमळ चिन्हावर लढण्याची तयारी असून उमेदवारी द्यावी, असा आग्रह या खासदारांचा आहे.

यासाठी शिंदे गटाचे सर्वच आमदार एकत्रित आले असून त्यांनी दबाव गट निर्माण केल्याची माहिती समोर येत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,345
एकनाथ शिंदे लोकसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर…

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.