Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखेर पोलीस आयुक्त कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन, त्यांच्याकडेच निमंत्रित सदस्यांना बोलविण्याचे अधिकार
महाराष्ट्र संवाद विशेष

अखेर पोलीस आयुक्त कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन, त्यांच्याकडेच निमंत्रित सदस्यांना बोलविण्याचे अधिकार

निमंत्रित सदस्य नेमण्याचे अधिकारही त्यांच्याकडेच
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

दि. ११ मार्च, मुंबई

नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटना व तत्सम बाबींची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे. या समितीने तीन महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या विरोधात केलेल्या विधानांचे पडसाद उमटले होते. भाजपाचे आमदार आशीष शेलार यांनी विधानसभेत अंतरवली सराटी प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली होती. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या हिंसक घटनांची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.

सोमवारी या संदर्भात राज्य सरकारच्या गृह विभागाने एसआयटी नेमण्याबाबतचा शासन निर्णय जारी केला. विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्यात आरक्षणाविषयी विविध ठिकाणी आंदोलने सुरू असताना आंदोलनाचा गैरफायदा घेऊन सामाजिक सलोखा आणि वातावरण अस्थिर करण्यासाठी जाळपोळ, दगडफेकीसारख्या हिंसक घटना जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करणे. मिडिया, सोशल मिडियाचा गैरवापर करून चुकीची माहिती देऊन तसेच अफवा पसरवून दंगे भडकविण्याचा प्रयत्न करणे या आणि इत्यादी बाबींसंदर्भात चौकशी करून तीन महिन्यात राज्य सरकारला  अहवाल सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.

सदर तपास पथकामध्ये निमंत्रित सदस्य म्हणून तज्ञ व्यक्तींना बोलविण्याचे, विशेष तपास पथकासाठी आवश्यक मनुष्यबळ राज्य सरकारच्या सहमतीने नियुक्त करण्याचे अधिकार समितीचे अध्यक्ष कर्णिक यांच्याकडे सोपविण्यात आले आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,085
एसआयटी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर…

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.