दि. १३ मार्च, नवी दिल्ली
२०२४ च्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ७२ उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी जाहीर केली. या यादीत राज्यातील २० उमेदवारांचा समावेश असून बहुतांश उमेदवारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूर मधून उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्यासह पंकजा मुंडे बीडच्या उमेदवार असतील. तर अहमदनगर दक्षिण मधून उमेदवार बदलाची चर्चा सुरू असतानाच भाजपाने विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

भाजप उमेदवारांच्या यादीत डॉ. हिना विजयकुमार गावित (नंदुरबार), डॉ. सुभाष भामरे (धुळे), श्रीमती स्मिता वाघ (जळगाव), रक्षा खडसे (रावेर), अनुप धोत्रे (अकोला), रामदास तडस (वर्धा), सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर), प्रतापराव पाटील चिखलीकर (नांदेड), रावसाहेब दानवे (जालना), डॉ. भारती पवार (दिंडोरी), कपिल पाटील (भिवंडी), पियुष गोयल (मुंबई उत्तर), मिहीर कोटेचा (मुंबई उत्तर पूर्व), मुरलीधर मोहोळ (पुणे), सुधाकर शृंगारे (लातूर), रणजीतसिंह निंबाळकर (माढा) आणि संजय काका पाटील (सांगली) यांचा उमेदवारांमध्ये समावेश आहे.
महाराष्ट्रासह दादरा नगर हवेली येथून एका, दिल्लीतून दोघा, गुजरात मधून सात, हरियाणातून सहा, कर्नाटक मधून वीस, मध्यप्रदेश मधून पाच, तेलंगणा मधून सहा, त्रिपुरा मधून एक आणि उत्तराखंड मधून दोघांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.
Lok Sabha Elections 2024: BJP releases second list of 72 candidates. Union Minister Anurag Thakur to contest from Hamirpur, Union Minister Nitin Gadkari from Nagpur, Union Minister Pralhad Joshi from Dharwad, and former Haryana CM Manohar Lal Khattar from Karnal. (n/2)… pic.twitter.com/9mIjP88zQF
— Press Trust of India (@PTI_News) March 13, 2024
भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेले ७२ उमेदवार पुढीलप्रमाणे… बघा यादी…








