दि. १६ मार्च, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीची घोषणा काही तासांवर आली असताना भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले. शनिवारी दुपारी सव्वा वाजता त्यांच्या भाजप प्रवेशाचा सोहळा मुख्यालयात पार पडला.
चार राज्यातील विधानसभा निवडणुकीची व देशातील लोकसभा निवडणुकीची निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याच्या काही तास आधीच यांनी केलेल्या भाजप प्रवेशाला महत्व प्राप्त झाले आहे.
९० च्या दशकात बॉलीवूड आणि भक्ती गीतांनी चहा त्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या अनुराधा पौडवाल नावलौकिक प्राप्त गायिका असून त्या ६९ वर्षाच्या आहेत.
एस. डी. बर्मन यांचे सहाय्यक आणि संगीतकार असलेल्या अरुण पौडवाल यांच्याशी त्यांचा १९६९ मध्ये विवाह झाला होता.


