Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » साकुरच्या घटनेची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल, गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंबाबद्दल अहवाल सादर करण्याचे निर्देश; बघा व्हिडिओ…
महाराष्ट्र संवाद विशेष

साकुरच्या घटनेची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल, गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंबाबद्दल अहवाल सादर करण्याचे निर्देश; बघा व्हिडिओ…

तपासात हलगर्जीपणा नको
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/03/2024Updated:19/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

दि. १९ मार्च, मुंबई

अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर बदनामीच्या भीतीने तिने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्यानंतर जवळपास पंधरा दिवसानी या घटनेतील आरोपींवर बाल लैगिक अत्याचार (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी आणि गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंबाबाबत तात्काळ अहवाल सादर करावा, असे निर्देश संगमनेरच्या पोलीस उपाधीक्षकांना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पठार भागामध्ये राहत असलेले एका दहावीच्या विद्यार्थिनीवर अमानुषपणे अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वी देखील संगमनेर शहरात काही आरोपींनी एका दहावीतील अल्पवयीन मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. याप्रकरणी देखील पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन प्रमुख आरोपी, त्यांना मदत करणारे, कॅफे चालक, आणि लॉज चालक-मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका आरोपींना न्यायालयात जामीन मिळविण्यास अनुकूल ठरली होती.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/03/VID-20240319-WA0016.mp4

या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतल्याने या प्रकरणाचा तपास योग्य रीतीने होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

या घटनेचे वृत्त वेबसाईट वरून प्रसिद्ध होताच उपसभापती गोऱ्हे यांनी तातडीने संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधक या प्रकाराची माहिती घेतली. गोऱ्हे यांनी या घटनेची जलदगतीने सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोरात कठोर शासन होईल. तसेच आरोपीला जामीन मिळू नये यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात यावेत. यामध्ये चौकशी अधिकारी म्हणून महिला पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करावी. सर्व पुरावे मिळवावेत व लवकरात लवकर चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करावे. पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्यात यावे. सदर आरोपींकडून मुलीच्या पालकांवर वारंवार दबाव आणला जातो आहे त्यामुळे तिच्या पालकांना त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करावे तसेच वेळप्रसंगी संरक्षण देण्यात यावे. या केससाठी सक्षम सरकारी वकील देण्यात यावा असे निर्देश उपसभापती गोऱ्हे यांनी दिले आहे.

गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंबाबाबत व सदर घटनेबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल तात्काळ उपसभापती कार्यालयास सादर करण्याचे देखील त्यांनी आदेश दिले. दरम्यान या प्रकरणी अटक केलेल्या पाच पैकी तिघा आरोपींना न्यायालयाने २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,440
गुन्हेगारी डॉक्टर नीलम गोऱ्हे दखल पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा…

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.