Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » साकुरची घटना मानवतेला काळीमा फासणारी, आरोपींना कडक शिक्षा व्हावी; डॉ. जयश्रीताई थोरात
महाराष्ट्र संवाद विशेष

साकुरची घटना मानवतेला काळीमा फासणारी, आरोपींना कडक शिक्षा व्हावी; डॉ. जयश्रीताई थोरात

पीडितेच्या कुटुंबीयांची व पोलीस उपाधीक्षकांची घेतली भेट
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/03/2024Updated:20/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार दि. २० मार्च, संगमनेर

साकुर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार व तिच्या मृत्यूप्रकरणी पोलीस यंत्रणेने तातडीने तपास पूर्ण करत आरोपींना कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करण्याची मागणी जयहिंद महिला मंच, एकविरा फाउंडेशनच्यावतीने तालुका काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली आहे.

थोरात यांनी महिला कार्यकर्त्यांसह पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची भेट घेत या घटने संदर्भातील माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी पोलीस प्रशासनाने सखोल तपास करण्याची मागणी केली.

साकुर येथे दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर तिने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. उशिराने या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून काही आरोपींना अटक केली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्यासह राज्य महिला आयोग व विविध संस्थांनी याप्रकरणी दखल घेत कठोर कारवाईच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिले आहे.

जयहिंद महिला मंच व एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला असून आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांना देण्यात आले.

यावेळी कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते, अर्चना बालोडे, निर्मला गुंजाळ, पद्मा थोरात, बेबी थोरात, सुनीता कांदळकर, सुरभी मोरे, तृष्णा औटी, तपस्या देशमुख आदींसह विविध महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

थोरात म्हणाल्या… झालेली घटना ही मानवतेला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनीही तीव्र निषेध केला आहे. या घटनेतील सर्व आरोपींना तातडीने कडक शिक्षा झाली पाहिजे. त्यांना न्यायालयात जामीन मिळता कामा नये तसेच मुलीचे आई-वडील व कुटुंबीय भयग्रस्त झाले असून त्यांना सरकारकडून संरक्षण व मदत मिळाली पाहिजे.

एकविरा फाउंडेशन व जयहिंद महिला मंचच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की… साकुर येथे अल्पवयीन असलेल्या इयत्ता दहावीच्या मुलीवर झालेली अत्याचाराची घटना ही अत्यंत दुर्दैवी व निंदनीय आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत असून यातील आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे. याचबरोबर या घटनेच्या चौकशीसाठी स्वतंत्र पोलीस महिला अधिकाऱ्याची नेमणूक करावी तसेच यातील सर्व आरोपींना लवकरात लवकर कडक शिक्षा झाली पाहिजे. याबरोबर या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना शासनाकडून संरक्षण मिळावे व तसेच त्यांना मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत मिळावी. या निवेदनावर शहराच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह जयहिंद महिला मंच आणि एकविरा फाउंडेशनच्या विविध महिला भगिनींच्या सह्या आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,260
डॉ. जयश्री थोरात पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा…

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.