Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

आज शुक्रवार, १२ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 12, 2026

नव्या पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलात केले मोठे फेरबदल, अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याचे गॅझेट बाहेर

June 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दुग्धविकास मंत्र्यांची जाहिरात बाजी; दूध उत्पादक शेतकरी श्रीमंत होणार…. हा तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार: डॉ. अजित नवले
राजकारण

दुग्धविकास मंत्र्यांची जाहिरात बाजी; दूध उत्पादक शेतकरी श्रीमंत होणार…. हा तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार: डॉ. अजित नवले

करावा तेवढा निषेध थोडा
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 21, 2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार दि. २१ मार्च, अकोले

राज्यात दुधाचे भाव सातत्याने कोसळत असताना शेतकरी श्रीमंत होणार, शेतकऱ्याला दुधाचे पैसे मिळणार, मार्चअखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार अशी जाहिरातबाजी करून राज्याचे दुग्धविकास तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया कॉम्रेड डॉ. अजित नवले यांनी व्यक्त करत दुग्ध विकास मंत्री आणि सरकारचा तीव्र निषेध केला आहे.

डॉ. नवले यांनी मंत्र्यांच्या या जाहिरातबाजीवर संतप्त होत सोशल मीडियातून प्रतिक्रिया व्यक्त केली असून सरकारवर जबरदस्त टीका केली आहे. दुधाचे भाव आणखी कोसळलेले असताना दुग्धविकास मंत्री काय जाहिरात करत आहेत पहा असे म्हणत सोशल मीडियावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

नवले यांनी म्हटले की, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. अनुदानाची घोषणा झाली मात्र अटी, शर्ती व ऑनलाइन डेटाच्या जटीलतेमुळे शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. अशा पार्श्वभूमीवर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पाच रुपयाच्या न मिळालेल्या अनुदानाच्या जोरावर शेतकरी श्रीमंत होणार असल्याच्या जाहिराती करत असतील तर यापेक्षा अधिक खेदजनक दुसरी कोणतीही गोष्ट असू शकत नाही.

राज्यातले सरकार व दुग्धविकास मंत्र्यांचा अशा जाहिरातीबाबत, असंवेदनशीलतेबाबत तसेच निष्क्रियतेबाबत करावा तेवढा निषेध थोडा आहे. असेही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्ष समितीचे डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,466
डॉक्टर अजित नवले राधाकृष्ण विखे पाटील
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

By अनंत पांगारकरJune 12, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई | विशेष प्रतिनिधी: राज्यात बहुचर्चित असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’वरून…

आज शुक्रवार, १२ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 12, 2026

नव्या पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलात केले मोठे फेरबदल, अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याचे गॅझेट बाहेर

June 11, 2026

संगमनेर नजीकच्या आढा ओढ्यात अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू!

June 11, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.