Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आई विडी कामगार, वडील पेंटिंग काम करणारे आणि मुलगा झाला सहाय्यक विक्रीकर आयुक्त! सामान्य कुटुंबातील मुलाची यशोगाथा
महाराष्ट्र संवाद विशेष

आई विडी कामगार, वडील पेंटिंग काम करणारे आणि मुलगा झाला सहाय्यक विक्रीकर आयुक्त! सामान्य कुटुंबातील मुलाची यशोगाथा

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार दि. २२ मार्च, अकोले

ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या जिद्दीच्या बळावर सामान्य कुटुंबातील एखादा तरुण अथवा तरुणीही यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकते. घरात फारशी सुबत्ता नाही, रोज कमवायचे आणि खायचे अशा परिस्थितीत सामान्य कुटुंबात एखादा दिवा पेटला की त्याचा उजेड संपूर्ण कुटुंबासोबतच गावालाही जाणवतो. आणि गावासाठी ती अभिमानाची बाब ठरते, याचा वस्तुपाठ घालून देणारे उदाहरण संगमनेर नजीकच्या अकोले तालुक्यातील आदिवासी गाव असलेल्या कोतुळमध्ये समोर आले आहे.

घरात सदासर्वदा दारिद्र शेळके कुटुंबात आई विडी कामगार, पेंटर काम करताना फावल्या वेळात एखाद्या वृत्तपत्रासाठी बातमीदारी करणारे वडील अशोक शेळके आणि चार मुले यांच्या कुटुंबात परिस्थितीची जाणीव ठेवत आपल्या स्वप्नाला संतोष (शिवा) शेळके याने गवसणी घातली. नुकत्याच झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सहाय्यक विक्रीकर आयुक्त (असिस्टंट कमिशनर ऑफिसर स्टेट ऑफ महाराष्ट्र) या पदावर त्याची नियुक्ती झाली.

संतोष (शिवा) शेळके हा कोतुळ येथील कोतुळेश्वर विद्यालयात दहावीच्या केंद्र परीक्षेत केंद्रात पहिला, नासिक येथे मेकॅनिकल इंजीनियरिंगला पहिला, तर राज्य लोकसेवा आयोग परीक्षेतही क्लास वन, व टू अशा दोन परीक्षेत त्याने यश मिळवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. प्रथम लोकसेवा आयोगातील मंत्रालयीन सहायक कक्ष अधिकारी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या पदावर रुजू झाला. पाठोपाठ महाराष्ट्र राज्य सहाय्यक विक्रीकर आयुक्त या क्लासवन पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याचा हा प्रवास सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा ठरला आहे. सामान्य कुटुंबातील संतोषला यादरम्यान अनेक ग्रामस्थ, नातेवाईकांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला. त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी आई-वडिलांनी देखील अपार कष्ट केले.

यशाचे शिखर गाठताना शिवाने आपला अभ्यास सांभाळून आपल्या दोन बहिणींनाही योग्य मार्गदर्शन केल्याने त्यांचीदेखील आरोग्य विभागात पुणे व ठाणे येथे निवड झाली आहे. या आनंदात वाजत गाजत फुलांच्या वर्षावात हार, तुरे, फेटे बांधून गावाने त्याची आई-वडिलांसोबत मिरवणूक काढली. अन आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले.

एकाग्रतेने चांगला अभ्यास केला तर परिस्थितीवर मात करता येते. मग यश आपल्या पायाशी लोटांगण घेईल हे आजच्या युवा पिढीने ध्यानात घ्यावे. – संतोष (शिवा) शेळके.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 786
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची…

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.