Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाजपची साथ सोडत संगमनेरमधील ‘या’ पदाधिकाऱ्याने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पुन्हा धरला काँग्रेसचा ‘हात’ !
राजकारण

भाजपची साथ सोडत संगमनेरमधील ‘या’ पदाधिकाऱ्याने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पुन्हा धरला काँग्रेसचा ‘हात’ !

आपण कुठेतरी विरोध करतो आहोत याची खंत मनामध्ये होती
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 24, 2024Updated:March 24, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेरात अशांतता निर्माण करणाऱ्यांना जनतेने ओळखले आहे: थोरात

भाजपमध्येही अत्यंत निष्ठेने काम केले परंतु त्या ठिकाणी स्वार्थ: शेजुळ

रविवार दि. २४ मार्च, संगमनेर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण भाजपमध्ये जात असताना संगमनेरात मात्र भाजपचे दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष ॲड. रामदास शेजुळ यांनी आपल्या समर्थकांसह रविवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील शॅम्प्रोत हा प्रवेश केला आहे. शेजवळ यांच्यासह ओझर परिसरातील त्यांच्या समर्थकांचादेखील यामध्ये समावेश आहे. यावेळी कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, शंकरराव खेमनर, मीरा शेटे, ॲड. लक्ष्मण खेमनर, संतोष हासे, राजेंद्र चकोर आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यांनी केला प्रवेश…

ॲड.रामदास शेजुळ यांच्यासह भाऊसाहेब शेजुळ, राजेंद्र शेजुळ, दिलीप शेपाळ, बाळासाहेब शिंदे, दादा पाटील शेजुळ, नामदेव थोरात, गंगाधर शेजुळ यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थकांचा यात समावेश आहे.

आमदार थोरात म्हणाले, चांगल्या कामामुळे संगमनेर तालुक्याचा राज्यात आणि देशात सन्मान झाला आहे. तालुक्यातील जनतेचे प्रेम आणि नेतृत्वाचा विश्वास यामुळे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची मोठी संधी आपल्याला मिळाली. यामध्ये तालुक्यातील जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. तालुक्यात कार्यकर्त्यांची अत्यंत चांगली फळी आहे. सर्व सहकारी संस्था चांगल्या सुरू आहेत. येथील राजकारण, समाजकारण राज्याला दिशादर्शक आहे. काम करणाऱ्याला संधी मिळत असून कधीही भेदभाव केला जात नाही. कार्यकर्त्यांना कायम सन्मान आहे.

याउलट अनेक ठिकाणी स्वार्थी राजकारण असते. संगमनेरमध्ये मात्र सन्मानाचे राजकारण असते. रामदास शेजुळ यांनी व्यक्तिगत टीका टिप्पणी कधी केली नाही. तालुक्याच्या विकासात खोडा घालण्याचे काम अनेक लोक करत आहेत. अशांतता निर्माण करत आहेत. परंतु आता जनतेने त्यांना ओळखले आहे. विकासाची व चांगल्या कामाची तालुक्याची ओळख असल्याने हीच परंपरा आपल्याला पुढे घेऊन जायची आहे.

ॲड. शेजुळ म्हणाले… स्वगृही परतल्याचा मला आनंद आहे. स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा मी निष्ठावंत कार्यकर्ता. परंतु मित्र प्रेमामुळे मी विकासाच्या राजकारणापासून बाजूला गेलो. भाजपमध्येही अत्यंत निष्ठेने काम केले. परंतु त्या ठिकाणी स्वार्थ आहे.

आमदार थोरात व थोरात घराणे हे निस्वार्थी काम करत आहे. त्यांच्या चांगल्या कामाचा राज्यभर लौकिक आहे. आणि आपण कुठेतरी विरोध करतो आहोत याची खंत मनामध्ये होती. विरोधात असणारे अनेक जण स्वच्छ व सुसंस्कृत नेतृत्व असणारे थोरात यांचा व्यक्तिगत आदर करतात. यापुढील काळात काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम करू.

यावेळी गबाजी खेमनर, लक्ष्मण वर्पे, कारभारी साबळे, दत्तात्रय थोरात, अण्णासाहेब थोरात, संदीप नागरे, पुजाहारी दिघे, भाऊसाहेब साबळे, दगडू शिंदे, दादा शेपाळ, दगडू शेपाळ, अनिल साबळे, दत्तू वर्पे, अमोल साबळे, कैलास गोराणे, अमोल वर्पे, मुरलीधर थोरात, नारायण थोरात, डॉ तुषार दिघे आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 3,099
आमदार बाळासाहेब थोरात काँग्रेस रामदास शेजुळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

संगमनेर: तहसील, प्रांत, दिवाणी व जिल्हा न्यायालय आणि अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विजय…

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.