Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मतभेद मिटले, मनभेद कायम! आमदार राम शिंदेंनी लगावला टोला म्हणाले… मी भाजपाचा निष्ठावंत घरंदाज खानदानी कार्यकर्ता!
राजकारण

मतभेद मिटले, मनभेद कायम! आमदार राम शिंदेंनी लगावला टोला म्हणाले… मी भाजपाचा निष्ठावंत घरंदाज खानदानी कार्यकर्ता!

विखे पिता-पुत्रांना लोकसभेचा पेपर दिसतोय अवघड!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार दि. २५ मार्च, मुंबई

लोकसभा उमेदवारीनंतर प्रामुख्याने पुढे आलेल्या विखे पिता-पुत्र आणि आमदार राम शिंदे यांच्यातील वादात मध्यस्थी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर मंथन करण्यात आले. या बैठकीत विखे पिता पुत्र आणि शिंदे यांच्यातील वादावर तोडगा काढत मतभेद मिटले असले तरी मनभेद कायम असल्याचे समोर आले आहे.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघामधून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतीय जनता पक्षाने पुन्हा उमेदवारी जाहीर केल्यानंतर याच मतदारसंघातून इच्छुक असलेले विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. पाठोपाठ त्यांनी पाथर्डीमध्ये झालेल्या बैठकीवेळी देखील अनुपस्थिती दर्शविल्याने विखेंसोबतचा वाद आणखी स्पष्ट झाला होता. दरम्यान शिंदे यांनी आपण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी केलेल्या चर्चा नंतर निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक झाली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील या पिता-पुत्रांसह आमदार राम शिंदे या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत आपली नाराजी स्पष्ट करताना शिंदे यांनी विखे यांच्या विरोधातील तक्रारींचा पाढाच उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर वाचला.

प्रधानमंत्री मोदींनी दिलेला ‘अबकी बार ४०० पार’चा नारा पूर्ण करण्यासाठी आमदार शिंदे यांनी आपली नाराजी बाजूला ठेवत सुजय विखे यांना निवडणुकीत मदत करण्याचे आदेश देतानाच विखे पिता-पुत्रांना देखील समज दिल्याची माहिती समोर येत आहे.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विखेंबद्दल असलेल्या माझ्या सगळ्या तक्रारी ऐकून घेतल्या. विखेंसोबत असलेले मतभेद विसरून प्रधानमंत्री मोदींनी दिलेला ‘अबकी बार ४०० पार’चा नारा पूर्ण करण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. मी भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याने पंतप्रधान मोदींचा शब्द पूर्ण करण्यासाठी काम करणार आहे. मी विखे यांच्या आधीपासूनचा भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षादेश पाळण्याविषयी नव्याने मला काही सांगण्याची गरज नाही असा देखील टोला विखे पिता-पुत्रांना लगावला.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर पक्षीय पातळीवरचे आमचे मतभेद मिटले आहे. आमच्यात वैयक्तिक पातळीवर काही मतभेद असले तरी ते राजकारणात काढायचे नसतात. मी घरंदाज निष्ठावंत भाजपचा कार्यकर्ता आहे, असं देखील विखेंना उद्देशून शिंदे म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 728
डॉक्टर सुजय विखे देवेंद्र फडणवीस भाजप राधाकृष्ण विखे राम शिंदे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

By Annant Ppangarkar14/10/20260

माझा गाव माझा अभिमान… राजापूर भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो.…

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.