Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरकर एकवटले… अशांतता निर्माण करत वातावरण बिघडविणाऱ्यांवर कडक कारवाईची सर्वधर्मीय, सर्वपक्षीय मागणी; प्रांताधिकारी, पोलीस उपाधीक्षकांना दिले निवेदन
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरकर एकवटले… अशांतता निर्माण करत वातावरण बिघडविणाऱ्यांवर कडक कारवाईची सर्वधर्मीय, सर्वपक्षीय मागणी; प्रांताधिकारी, पोलीस उपाधीक्षकांना दिले निवेदन

संगमनेर अशांततेच्या उंबरठ्यावर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/03/2024Updated:25/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार दि. २५ मार्च, संगमनेर

गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या, कायदा सुव्यवस्थेलाच आव्हान देणाऱ्या घटना सातत्याने दोन धर्मीयात घडत आहे. काही अपप्रवृत्ती शहरात अशांतता निर्माण करत असून अशा चितावणीखोर व गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सर्वपक्षीय व सर्वधर्मीय संगमनेरकर एकवटले होते.

संगमनेरची शांतता धोक्यात आणणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाईच्या मागणीसाठी प्रांताधिकारी शैलेश हिंगे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती…

माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दिलीप पुंड व विश्वास मुर्तडक, उद्योजक मनीष मालपाणी, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी, संजय फड, शिवजयंती उत्सव समितीचे सागर बागे, भाजपा युवा मोर्चाचे दीपेश ताटकर, व्यापारी असोसिएशनचे प्रकाश कलंत्री, गजेंद्र नाकील, मोहसीन शेख, दीपक साळुंखे, संतोष करवा, जावेद शेख, रियाज सय्यद, समीर ओझा, गजेंद्र अभंग, नरेंद्र ओझा, आजिज ओहरा , गणेश मादास, जसपाल डंग, ओंकार भंडारी, किशोर पवार, मोहसीन रशीद शेख, अर्चना बालोडे, डॉ. श्रद्धा वाणी, संज्योत वैद्य, निर्मला गुंजाळ, डॉ. दिपाली पानसरे, किशोर टोकसे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह ढोमसे पाटील यांच्यासह सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की… 

गेल्या अनेक दिवसापासून संगमनेर शहर व तालुक्यातील जनतेमध्ये अस्वस्थता व अशांतता निर्माण करण्याच्या घटना सातत्याने घडत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील व तालुक्यातील सर्वसाधारण नागरिक, व्यावसायिक व इतर वर्ग यांना वेठीस धरण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. संगमनेर हे सुसंस्कृत गाव असून अशांतता निर्माण करणाऱ्या अशा अपप्रवृत्तींना जनतेने नेहमीच एकत्रितपणे विरोध केला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने निरपेक्ष रहावे व अशांतता पसरवणाऱ्या गुन्हेगारांना आणि चिथावणीखोरांना वेळीच पायबंध घालावा. तसेच त्यांच्यावर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी. शांतता, सुव्यवस्था निर्माण करण्याच्या प्रशासनास प्रयत्न आमचे कायम सहकार्य राहील याची ग्वाही आम्ही देतो.

(बातमीतील छायाचित्र राजेंद्र सुतार)

प्रांताधिकारी, पोलीस उपाधीक्षकांना दिलेले निवेदन

संगमनेरची शांतता भंग करण्यासाठी काही अज्ञात शक्ती षडयंत्र करत आहेत. हे अगदी मोजके लोक असून त्यांच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका तसेच अशा विध्वंसक प्रवृत्तीच्या लोकांना ओळखून तातडीने पोलीस यंत्रणांना माहिती द्या. अशांतता निर्माण करू पाहणारे गुन्हेगार व त्यांच्या पाठीशी असणारे चिथावणीखोर यांच्यावरही प्रशासनाने तातडीने कडक कारवाई करावी. दुर्गाताई तांबे (माजी नगराध्यक्ष)

सणासुदीच्या व उत्सवाच्या काळामध्ये काही मोजक्या लोकांकडून अशांतता निर्माण करून सामाजिक तेढ निर्माण केले जात आहे. हे अत्यंत दुर्दैवी असून संगमनेरमधील सुज्ञ, सुजाण व सुसंस्कृत नागरीक अशा षड्यंत्राला बळी पडणार नाही. अशी भावना सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत असून कोणीही अफवा पसरू नये तसेच चुकीच्या लोकांना पाठीशी घालू नये. अमर कतारी (माजी शिवसेना शहरप्रमुख)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,770
दुर्गाताई तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची…

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.