Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप
राजकारण

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

या सरकारमध्ये समाज कल्याण खाते शिवसेनेकडे (शिंदे गट) असतानाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्री यावर काहीच बोलत नाहीत, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
मुंबई | विशेष प्रतिनिधी:
राज्यात बहुचर्चित असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’वरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते यांनी महायुती सरकारच्या आर्थिक नियोजनावर आणि या योजनेच्या निधी वाटपावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी शासनाने समाज कल्याण विभागाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वळवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून सरकारच्या या कारभाराचा जाहीर निषेध केला आहे.
उत्कर्षाताई रूपवते यांनी सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी समाज कल्याण विभागाचे तब्बल ३४४.७४ कोटी रुपये एका शासन निर्णयाच्या (जीआर) माध्यमातून लुबाडण्यात आले आहेत. ही केवळ निधीची पळवापळवी नसून एक प्रकारे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रकार आहे. ही योजना कशीतरी जिवंत ठेवण्यासाठी सरकारकडून सातत्याने समाज कल्याण विभागाचा, विशेषतः दलित आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी असलेला निधी दुसरीकडे वळवला जात आहे, जो अत्यंत निंदनीय आहे.
समाज कल्याण विभागाच्या मूळ योजनांचे काय होणार, असा सवाल उपस्थित करत रूपवते यांनी प्रशासकीय ढिसाळपणावर बोट ठेवले. सरकारने समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप, घरकुल योजना आणि इतर कल्याणकारी योजना पुढे कशा चालवायच्या, याचे कोणतेही ठोस नियोजन केलेले नाही. या योजनांचे भवितव्य वाऱ्यावर सोडून केवळ लाडकी बहीण योजना कशी सुरू राहील, यासाठीच सरकारची धडपड सुरू आहे. अशा पद्धतीने निधी वळवल्यामुळे मागासवर्गीय समाजाच्या विकासाला मोठा खिळ बसेल आणि या विभागाच्या योजना बंद पडण्याच्या मार्गावर येतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी राज्याच्या वाढत्या कर्जाचा मुद्दा उपस्थित करत थेट अर्थमंत्रालयावर निशाणा साधला. महाराष्ट्र सरकारवर आज ११ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. राज्याची आर्थिक स्थिती एवढी गंभीर असताना, कोणतेही आर्थिक नियोजन न करता केवळ राजकीय फायद्यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी पैसे लुबाडण्याची सवय सरकारला लागली आहे, असा घणाघात त्यांनी केला. या सरकारमध्ये समाज कल्याण खाते शिवसेनेकडे (शिंदे गट) असतानाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्री यावर काहीच बोलत नाहीत, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
वंचित बहुजन आघाडीचा लाडकी बहीण योजनेला विरोध नाही, ही योजना सुरूच राहिली पाहिजे, अशी भूमिका उत्कर्षाताई रूपवते यांनी स्पष्ट केली. मात्र, त्यासाठीचे आर्थिक नियोजन करण्यात महायुती सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. विशेषतः अर्थखाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली चूक कबूल करून यामध्ये तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा हक्काचा निधी हिरावून घेतल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून जाब विचारेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 379
उत्कर्षा रुपवते निधी लाडकी बहीण योजना वंचित बहुजन आघाडी समाज कल्याण विभाग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरातील प्रभाग क्रमांक ३…

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.