धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू
मंगळवारी सकाळी नदीकाठी मासेमारीसाठी गेलेल्या तरुणांना त्यांचे कपडे आढळले आणि त्यानंतर शोध घेतला असता दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आले

मंगळवारी सकाळी नदीकाठी मासेमारीसाठी गेलेल्या तरुणांना त्यांचे कपडे आढळले आणि त्यानंतर शोध घेतला असता दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आले. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
तर सार्थक निमसे हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. धार्मिक कार्यात आनंदाने सहभागी झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच दोघांवर काळाने घाला घातल्यामुळे संपूर्ण जुने भालगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
