Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी या कारणासाठी मानले संगमनेरकर शिवप्रेमी शिवसैनिक, शिवभक्त आणि प्रशासनाचे आभार!
Uncategorized

शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी या कारणासाठी मानले संगमनेरकर शिवप्रेमी शिवसैनिक, शिवभक्त आणि प्रशासनाचे आभार!

तणावाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीकडे लागले होते लक्ष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार दि. २८ मार्च, संगमनेर

तिथीनुसार पारंपारिक शिवजयंती उत्सव मोठा जल्लोषात संगमनेरकर साजरा करत असतात. शिवजयंती उत्सव समिती, शहर शिवसेना प्रणित बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळ, रंगारगल्ली शिवसेना शाखेसह शहर व उपनगरात मोठा उत्साहात दिवसभर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी संगमनेरमध्ये घडलेल्या तणावपूर्ण घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या मदतीने शिस्तीचे पालन करत शिवजयंती उत्सव साजरा केल्याबद्दल शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी सर्वांचे आभार मानले आहे.

प्रशासनाने अत्यंत काटेकोरपणे केलेले नियोजन आणि संवेदनशील असलेले वातावरण पाहता शिवजयंती उत्सव समितीच्या बाईक रॅलीस आणि अमर कतारी संस्थापक अध्यक्ष असलेल्या हिंदूहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळाच्या पारंपरिक मिरवणुकीला अधिकृतपणे पोलीस प्रशासनाने परवानगी दिली होती.

परवानगी दिल्यावरदेखील शिवसेना संगमनेर शहराच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्णाकृती मूर्ती मुख्य मिरवणुकीत सहभागी करण्यासाठी शहर शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी हट्ट धरला. मात्र पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळ यांना मिरवणुकीत मानाचे पहिले स्थान दिले व त्यानंतर संगमनेर शहर शिवसेनेच्या मिरवणुकीला दुसरे स्थान दिले व वाद मिटवला. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळाच्या मिरवणुकीत सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यांना मानसन्मान देण्यात आला व मिरवणूक शांततेत पार पडली.

भव्य अश्या बाईक रॅलीची सुरुवात चंद्रशेखर चौकातून झाली. शहर व तालुक्यातील शेकडो युवक रॅलीत सहभागी झाले. संध्याकाळी पारंपरिक शिवजयंती मिरवणूकीला संगमनेर नगरपालिकेपासून प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, मुख्याधिकारी राहुल वाघ आदी प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.

यावेळी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळासोबतच संगमनेर शिवसेना ठाकरे गट व शिंदे गट आणि उत्सव समिती सहभागी झाली होती. प्रचंड जल्लोषात मिरवणूक पार पाडली. यावेळी कतारी यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष त्रिलोक कतारी, भाऊसाहेब हासे, अमित फटांगरे, प्रथमेश बेल्हेकर, अमित चव्हाण, दीपक साळुंखे, राजू सातपुते, अमोल डुकरे, शिवसेनेचे आप्पा केसेकर जालिंदर लहांमगे, योगेश बिचकर, शिंदे गटाचे रमेश काळे, शिवजयंती उत्सव युवक समितीचे अध्यक्ष सागर बागे, मोटरसायकल रॅली प्रमुख साजन कतारी, पप्पू नेहुलकर, शैलेश कलंत्री, अंबादास आडेप, मंगेश सालपे, कपिल टाक, मनीष माळवे, कल्पेश पोगुल, नरेश माळवे आदिल्स संगमनेरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,032
अमर कतारी शिवजयंती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.