Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

आज शुक्रवार, १२ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘तुम्ही सर्वांसाठी, मग ते भ्रष्टाचारी असले तरी त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकणार का?’ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या… “भाजपाचे दरवाजे सर्वांसाठी उघडे, आम्ही त्यांचे स्वागत करू” बघा आणखी काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये
राजकारण

‘तुम्ही सर्वांसाठी, मग ते भ्रष्टाचारी असले तरी त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकणार का?’ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या… “भाजपाचे दरवाजे सर्वांसाठी उघडे, आम्ही त्यांचे स्वागत करू” बघा आणखी काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये

सीतारामन यांच्या कबुलीने भाजपाची गोची
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 31, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार दि. ३१ मार्च 

ईडी, सीबीआय, आयकर विभागाचा ससेमिरा मागे लागलेल्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला किंवा एनडीएत सहभागी झाले की त्यांच्या मागच्या सगळ्या चौकशा बंद होतात. हे नेते भाजपच्या ‘वाशिंग मशीन’मधून स्वच्छ होऊन निघतात. महाराष्ट्रासह देशभरात भाजपचे हे ‘वाशिंग मशीन’ जोरात सुरू असल्याचे दिसते. एकेकाळी ज्या नेत्यांवर भाजपने कोट्यवधींच्या घोटाळ्याचे आरोप केले आता तेच नेते त्यांच्यासोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसत आहेत. यावरून विरोधी पक्ष सातत्याने भाजपवर हल्ला चढवत आहेत. विरोधकांकडून होणाऱ्या या आरोपांवर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी एका कार्यक्रमात उत्तर दिले. मात्र त्यांच्या उत्तरामुळे पक्षाची गोची झाली आहे.

‘निवडणुकीच्या तोंडावर दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्यात आले. विरोधी पक्षांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. तुम्ही एकेकाळी ज्या नेत्यांना भ्रष्टाचाराचा ‘आदर्श’ म्हणून हिणवत होतात ते नेतेच आता भाजपसोबत आहेत. आदर्श घोटाळ्याचे आरोपी अशोक चव्हाण, तसेच तुम्ही ज्यांना तुरुंगात ‘चक्की पिसिंग… चक्की पिसिंग’साठी पाठवणार होते ते ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप असणारे अजित पवार आता भाजपच्या विकासाचे आयकॉन झाले आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटते? असा परखड सवाल ‘टाईम्स नाऊ’ समिट या कार्यक्रमात निर्मला सीतारमण विचारण्यात आला.

याला उत्तर देताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, आम्ही त्यांना पक्षात घेत नाही, तर ते आमच्यासोबत येत आहेत. सर्वांसाठी भाजपचे दरवाजे सदैव उघडे आहेत. आमचे मुख्य उद्दिष्ट विकास हेच आहे. यावर पत्रकारांनी ‘तुम्ही सर्वांसाठी, मग ते भ्रष्टाचारी असले तरी त्यांच्यासाठी ‘रेड कार्पेट’ टाकणार का?’, असे विचारले असता, ‘भाजपचे दरवाजे सर्वांसाठी उघडे असून आम्ही त्यांचे स्वागत करू’, असे म्हटले. निर्मला सीतारामण यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये बघा….

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/03/ssstwitter.com_1711863037353.mp4

पैसे नसल्याने निवडणूक लढवणार नाही!

निवडणूक लढवण्यासाठी पुरेसे पैसे आपल्याकडे नसून ती जिंकण्यासाठी जाती-धर्मासारख्या विषयांचा आधार घेतला जात असल्याने ही निवडणूक आपण लढवणार नसल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. मला पक्षाच्या अध्यक्षांनी लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी विचारलं होतं. या निवडणुकीसाठी दक्षिण हिंदुस्थानमधील एका जागेचा प्रस्तावही देण्यात आला होता. आंध्रप्रदेश किंवा तामिळनाडू यापैकी एका जागेसाठी प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, दहा दिवस मी विचार केला आणि निवडणूक न लढवण्याचा निश्चय केला, असे त्या म्हणाल्या. (सौजन्य दै. सामना)

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 749
निर्मला सीतारामन भाजप
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By अनंत पांगारकरJune 12, 20260

संगमनेर: देशात सध्या सुरू असलेली लढाई ही केवळ सत्तेची नसून विचारधारेची आहे, शरद पवार यांच्या…

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

आज शुक्रवार, १२ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 12, 2026

नव्या पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलात केले मोठे फेरबदल, अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याचे गॅझेट बाहेर

June 11, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.