Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखेर उत्कर्षा रूपवते ‘वंचित’मध्ये, उमेदवारी निश्चित; शिर्डीतील राजकीय गणित बदलणार!
राजकारण

अखेर उत्कर्षा रूपवते ‘वंचित’मध्ये, उमेदवारी निश्चित; शिर्डीतील राजकीय गणित बदलणार!

शिर्डी लोकसभेतील घडामोडींकडे लक्ष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, दि.१८ एप्रिल 

राज्य महिला आयोगाच्या सदस्य, काँग्रेसच्या महासचिव पदासह सर्व पदांचा राजीनामा देणाऱ्या उत्कर्षा रुपवते यांनी अखेर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित कडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रुपवते वंचितच्या उमेदवार असल्यास या मतदारसंघातील राजकीय गणित बदलणार असून त्याचा सर्वाधिक फटका महाविकास आघाडीला बसण्याची चिन्ह आहेत.

बुधवारी रुपवते यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आपल्या सर्व पदांचा राजीनामा पाठवल्यानंतर पाठोपाठ त्यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आंबेडकरांच्या यशवंत भवन निवासस्थानी वंचित मध्ये प्रवेश केला असून आंबेडकर यांनी त्यांचे स्वागत केले आहे. यावेळी वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे उपस्थित होते.

महाविकास आघाडी कडून विशेषतः काँग्रेस कडून शिर्डी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी रूपवते इच्छुक होत्या. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न देखील केले होते. मात्र जागा वाटपात ही जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वाट्याला आली. शिवसेनेकडून या जागेवर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आले. शिवसेना, काँग्रेस, भाजप पुन्हा शिवसेना असे पक्षांतर करणाऱ्या वाकचौरे यांच्या बद्दल मतदार संघात फारशी सहानुभूती नाही त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी अशी अपेक्षा होती. उमेदवार बदलला जात नसल्याचे स्पष्ट होताच रूपवते यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडण्याचा निर्णय घेतला. रुपवते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्तीय असल्याने थोरात आणि काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले, संगमनेर सह अन्य तालुक्यात मोठा जनसंपर्क असलेल्या रूपवते परिवाराला मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. त्यामुळे याचा फायदा रुपवते यांना होऊ शकतो. उत्कर्षा रुपवते या काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मंत्री दादासाहेब रुपवते, माजी मंत्री मधुकरराव चौधरी यांची नात, दिवंगत काँग्रेस नेते प्रेमानंद रुपवते व स्नेहजाताई रुपवते यांच्या कन्या आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,043
उत्कर्षा रूपवते लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडी शिर्डी लोकसभा मतदारसंघ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.