Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निवडणूक प्रचार साहित्य छापताय तर मग ही काळजी घ्यावीच लागेल, नाहीतर होऊ शकते शिक्षा- निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर
राजकारण

निवडणूक प्रचार साहित्य छापताय तर मग ही काळजी घ्यावीच लागेल, नाहीतर होऊ शकते शिक्षा- निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर

शिर्डी लोकसभा मतदारसंघ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/04/2024Updated:23/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शिर्डी, मंगळवार दि.२३ एप्रिल 

शिर्डी लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात संबंधित मुद्रक, प्रिंटर्सनी प्रचार साहित्य तसेच इतर छपाई बाबत विशेष काळजी घेऊन आचारसंहितेचे पालन करावे. प्रचार साहित्यावर मुद्रक व प्रकाशकांचे नाव छापणे बंधनकारक असल्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले आहे.

काय सांगतो कायदा… लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या ‘कलम १२७ अ’ द्वारे निवडणूक पत्रकांच्या छपाईवर आणि प्रसिद्धीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याकडे सर्व राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार आणि मुद्रणालयांच्या चालक व मालकांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

हाताने नक्कल काढण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रक्रियेने छापण्यात किंवा अनेक प्रती काढण्यात आलेले निवडणुकीसंबंधीचे प्रत्येक पत्र, हस्तपत्रक, घोषणाफलक किंवा भित्तीपत्रक यांच्या दर्शनी भागावर मुद्रकांचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता प्रसिध्द करणे बंधनकारक आहे. कोणत्याही व्यक्तीला निवडणूक पत्रिका, भित्तीपत्रके, होल्डींग्स, फ्लेक्स बोर्ड तो स्वतःच त्याचा प्रकाशक आहे. याबद्दल स्वतः स्वाक्षरित केलेले आणि ज्या व्यक्ती तिला व्यक्तिशः ओळखतात अशा दोन व्यक्तीनी साक्षांकित केलेले अधिकथन त्याने मुद्रकाला दोन प्रतीमध्ये दयावेत.

जिल्हा दंडाधिकाऱ्याला पाठविल्याशिवाय मुद्रीत करता येणार नाही… दस्तऐवज मुद्रित झाल्यानंतर वाजवी मुदतीच्या आत, मुद्रक व प्रकाशकाने त्या दस्ताएवजाची एका प्रतीसह प्रकाशकाच्या अधिकथनाची एक प्रत राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी मुद्रित झाला असेल तर, मुख्य निर्वाचन अधिकाऱ्याला किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी मुद्रीत झाली असेल तर त्या जिल्ह्याच्या जिल्हा दंडाधिकाऱ्याला पाठविल्याशिवाय मुद्रीत करता येणार नाही किंवा मुद्रीत करवता येणार नाही.

या मजकूरासाठी बंदी… कोणतीही व्यक्ती मुद्रक किंवा प्रकाशक यांना धर्म, पंथ, जात, समाज किंवा भाषा यामध्ये तेढ निर्माण करणारे अथवा विरोधकाचे चारित्र्यहरण करणारे निवडणूक विषयक मजकूर व साहित्य प्रकाशित करता येणार नाही.

छपाई साहित्याची माहिती देणे बंधनकारक… भारत निवडणूक आयोग यांचेकडील सूचना तसेच लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम १२७ A मधील तरतूदीनुसार मुद्रक व प्रकाशक यांना जोडपत्र क व जोडपत्र ख मध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे अनुषंगाने छपाई साहित्याची माहिती देणे बंधनकारक आहे, असे अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कोळेकर यांनी कळविले आहे.

कोणती शिक्षा होऊ शकते… लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम १२७ A मधील तरतूदीं भंग केल्यास मुद्रक किंवा प्रकाशकास सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा दोन हजार रुपयापर्यत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास, किंवा व दोन्ही शिक्षा होऊ शकते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 638
आचारसंहिता बाळासाहेब कोळेकर लोकसभा निवडणूक शिर्डी लोकसभा मतदारसंघ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.