Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गोलमाल है भाई गोलमाल … बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून दिले १३ टन गोमांस, पोलिसांनी दप्तरी दाखविले ५ टन
गुन्हेगारी

गोलमाल है भाई गोलमाल … बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून दिले १३ टन गोमांस, पोलिसांनी दप्तरी दाखविले ५ टन

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर तालुक्यातील कासारे शिवारात कारवाई, दोघांना पकडले

कार्यकर्त्यांच्या प्रखर भूमिकेमुळे वजन केल्यावर गोमांस भरले १३ टन

मंगळवार, दि. २८ मे

गोवंश हत्या बंदी कायद्यानंतर शेकड्याने कारवाया, आंदोलने करून देखील देशाच्या अनेक भागात, काना कोपऱ्यात गोमांस पुरविणारे संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने सुरूच आहे. कोणत्याही कायद्याचा धाक येथील कसायांना राहायला नसल्याने पोलीस दलाच्या नाकावर टिच्चुन किंबहुना त्यांच्याच काही लोकांच्या आशीर्वादाने हे कत्तलखाने सुरू असल्याचा आरोप संगमनेरकर नागरिकांमधून नेहमी होतो.

मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल करून गोमांस वाहतूक होत असलेला एक आयशर ट्रक (MH17 BY7824) बजरंग दलाच्या श्याम प्रसाद थोरात, शाम रावबा नाईकवाडी, सुरेश मनोजकुमार कालडा यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासारे गावच्या शिवारात जांभूळवाडी फाटा ते विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान रोखून धरला होता. याची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस हवालदार राजेंद्र पालवे व दत्तात्रय बडधे घटनास्थळी गेले.

आयशर ट्रक मधून गोमांस वाहतूक केली जात असल्याचा कारणावरून पोलिसांनी जाकीर खान नसीर खान पठाण (वय ४९ वर्षे, रा. मोगलपुरा, संगमनेर) व आयुब मेहबूब कुरेशी (वय ५३ वर्ष, रा. कुरण रोड, इस्लामपुरा, संगमनेर) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीसह आयशर ट्रक पोलीस ठाण्यात आणला. पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार राजेंद्र पालवे यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

गोमांस पकडले तेरा टन दाखविले पाच टन … संगमनेरमधील गोवंश कत्तली मागे काही पोलिसांच्या सहभाग असल्याचे आरोप सातत्याने होतात. शहरात होणाऱ्या गोवंश तस्करी नंतर गोमांस वाहनात भरून ते तालुक्याबाहेर काढून देण्याचे काम देखील काही लोक करत असल्याची चर्चा असते. मात्र हा आयशर ट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या हाती सापडला. ट्रक पकडल्यानंतर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात पाच टन गोमांस असल्याचे फिर्यादीत म्हटले होते. मात्र ट्रक मधील गोमांसाची विल्हेवाट लावण्यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ट्रकचे पुन्हा एकदा वजन करण्यास पोलिसांना भाग पाडले. पडताळणी नंतर ट्रकमध्ये १३ टन गोमांस असल्याचे समोर आले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या जागरूकतेमुळे पोलिसांना पुन्हा सुधारित आकडेवारी दाखवावी लागली.

पोलीस संशयाच्या भोवऱ्यात … दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करतेवेळी ट्रकमध्ये असलेल्या गोमांसाच्या वजनाची खात्री न करताच अंदाजे ५ टन वजन दाखविण्याचा उद्योग कशासाठी आणि कोणासाठी केला हा प्रश्न निर्माण झाला आहे. मूळ वजनापेक्षा कमी वजन दाखवून तब्बल आठ टन गोमांस गायब करण्याचा पोलिसांचा नेमका हेतू काय होता? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,211
कत्तलखाना कारवाई बजरंग दल संगमनेर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar06/09/20260

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त…

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.