Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » “वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा
पत्रकारिता

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील भाजपचे कमळ हाती घेत विधान परिषदेची उमेदवारी मिळविली आहे. हे राजकीय नाट्य जिल्ह्यात रंगले असतानाच आता वाकचौरे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/06/2026Updated:04/06/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संपादकीय

अहिल्यानगरच्या राजकारणात सध्या शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील घडामोडी वेगाने बदलत आहेत. अशा वेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेले “वाकचौरे आता थांबणार नाहीत” हे विधान केवळ एक राजकीय टिप्पणी नसून आगामी राजकीय समीकरणांचे संकेत देणारे ठरले आहे.

राजकारणात नेत्यांची उपस्थिती आणि अनुपस्थिती यालाही अनेक अर्थ असतात. मंगळवारी (२ जून) खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डी मध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या बैठकीत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची अनुपस्थिती होती. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी चंद्रकांत खैरे यांना छेडले असता त्यांनी केलेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बद्दलचे वक्तव्य यामुळे चर्चांना अधिक उधाण आले. खैरे यांच्या एका वाक्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वाकचौरे खरोखरच पक्षांतराच्या मार्गावर आहेत का? की ही केवळ राजकीय दबावतंत्राची खेळी आहे? याची उत्तरे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.

महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतर ही नवीन बाब राहिलेली नाही. सत्तेचे समीकरण, मतदारसंघातील राजकीय गणित आणि वैयक्तिक राजकीय भविष्य आणि सध्याच्या काळात सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या मागे लागलेल्या विविध चौकशीच्या राजकीय ईडा पिडा या गोष्टींमुळे नेते अनेकदा नव्या वाटा निवडतात. त्यामुळे कोणत्याही नेत्याच्या हालचालींकडे राजकीय निरीक्षकांचे बारकाईने लक्ष असते. वाकचौरे यांच्या बाबतीतही नेमके हेच घडत आहे.

खासदार वाकचौरे यांचा पूर्व इतिहासही पक्षांतराचा राहिला आहे. काँग्रेसच्या परंपरागत असलेल्या व नंतर राखीव झालेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अनपेक्षितपणे शिवसेनेकडून खासदार झालेल्या वाकचौरे यांनी नंतर काँग्रेस-भाजप आणि पुन्हा शिवसेना असा राजकीय प्रवास केला आहे. शिवसेनेत मोठे फूट पडल्यानंतर मध्यंतरी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची तसेच ऑपरेशन टायगर मध्ये खासदार वाकचौरे यांचा समावेश असल्याची चर्चा रंगली होती.

मात्र या संपूर्ण प्रकरणात एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही. तो म्हणजे जनतेच्या अपेक्षा. मतदारांना पक्षांतराच्या चर्चांपेक्षा त्यांच्या भागातील विकासकामे, रोजगार, पायाभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्नांचे निराकरण अधिक महत्त्वाचे वाटते. नेत्यांच्या राजकीय स्थलांतरामुळे जनतेच्या प्रश्नांवर पडदा पडू नये, हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. मात्र या अपेक्षांना खासदार वाकचौरे फारसे यशस्वी झाल्याचे दिसत नाही.

मेळाव्यातील अनुपस्थिती नंतर खैरे यांच्या विधानामुळे निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आगामी काही दिवसांत तसा वेग घेते आहे, याची उत्सुकता आहे. वाकचौरे यांची पुढील भूमिका, ठाकरे गटाचे प्रयत्न आणि शिंदे गटाची रणनीती यावर अनेक राजकीय गणिते अवलंबून असतील. परंतु या सर्व घडामोडींमध्ये लोकशाहीचा केंद्रबिंदू असलेल्या मतदारांच्या हिताचा विचार प्रथम असणे गरजेचे आहे. राजकारणात चर्चांना आणि अफवांना नेहमीच स्थान असते; परंतु अंतिम निर्णय आणि त्यामागील भूमिका यावरच जनतेचा विश्वास टिकून राहतो. त्यामुळे वाकचौरे प्रकरण हे केवळ एका नेत्याच्या संभाव्य पक्षांतरापुरते मर्यादित नसून, अनेक विरोधी नेत्यांनी सत्ताधारी गटात जाणे पसंत केल्याने सध्या तरी पक्षांतर केलेल्या विरोधी नेत्यांचा सत्ताधारी गट महाराष्ट्रात बघावयास मिळत आहे. यात यात मूळ निष्ठावंत भाजपवाले मोठ्या प्रमाणात दुखावले देखील गेले आहेत. जिल्ह्यातील गेल्या काही दिवसातील घडामोडी बघता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील भाजपचे कमळ हाती घेत विधान परिषदेची उमेदवारी मिळविली आहे. हे राजकीय नाट्य जिल्ह्यात रंगले असतानाच आता वाकचौरे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे या चर्चेकडे देखील महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय प्रवाहाचे प्रतिबिंब म्हणून पाहिले जाणे अधिक योग्य ठरेल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 898
चंद्रकांत खैरे भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी शिवसेना ठाकरे मेळावा संजय राऊत संपादकीय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.