Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार, १३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 13, 2026

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लोकसभा निकाला संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले बघा व्हिडिओ…
राजकारण

लोकसभा निकाला संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले बघा व्हिडिओ…

राज्यात आणि देशात मोठे यश
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 4, 2024Updated:June 4, 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार दिनांक 4 जून 

लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत असून राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळताना दिसत आहे. त्यातही काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येत आहे. काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी, अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राज्यात महाविकास आघाडीला यश मिळाले.

जनतेने विखे यांच्या दहशतीचे झाकण उडवले असून अजून काही बाकी आहे तेही उडणार …

देश पातळीवर भाजपाकडून होत असलेले द्वेष भावनेचे राजकारण आणि राज्यांमध्ये चुकीचा पायंडा पाडून आलेले सरकार हे जनतेला मान्य झाले नसून याविरुद्ध जनतेने कौल दिला आहे. महाविकास आघाडीला भक्कम साथ दिली असून सरकार विरोधी रोष व्यक्त केला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली असून अहमदनगर जिल्ह्यात मंत्री विखे यांच्याकडून होत असलेले दहशतीचे राजकारण व चुकीच्या प्रशासनामुळे त्यांचा पराभव झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध माध्यमांच्या प्रतिनिधीशी यशोधन कार्यालय या ठिकाणी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, रणजीतसिंह देशमुख, सोमेश्वर दिवटे, विश्वास मुर्तडक, निखिल पापडेजा यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्र पक्षांचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

थोरात म्हणाले, देशातील सध्याचे राजकारण आणि राज्य पातळीवर चुकीचा पांयडा पाडून आलेले सरकार या विरोधात जनतेमध्ये अत्यंत रोष आहे. जनतेला असे चुकीचे राजकारण मान्य नसून मतदानातून तो जनतेने तो राग व्यक्त केला आहे. सत्ताधाऱ्यांकडून होत असलेला सत्तेचा गैरवापर, त्याचप्रमाणे वाढलेली बेरोजगारी, महागाई, भरती मधील गैरव्यवहार ,विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत गैर व्यवहार, राज्यात बिघडलेली राज्यातील शांतता सुव्यवस्था यामुळे जनता या सरकारवर नाराज आहे.

भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार नसतानाही सातत्याने जनतेमध्ये संपर्कात होते. त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. तसेच अहमदनगरमध्ये सुजय विखे हे तरुण होते. त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील मात्र मंत्री विखे यांनी ज्या पद्धतीने दहशतीचे राजकारण करून चुकीचे प्रशासन राबवले याबद्दल जिल्ह्यात मोठा रोष निर्माण झाला. जनतेने विखे यांच्या दहशतीचे झाकण उडवले असून अजून काही बाकी आहे तेही उडणार आहे

निलेश लंके हा एक सामान्य कार्यकर्ता आहे. कोरोना काळात त्यांनी मोठे काम केले. परंतु पारनेर मध्ये सरकारकडून निर्माण केलेली दहशत यामुळे निलेश लंके यांनी त्यांना मोठी टक्कर देऊन विजय मिळवला आहे. काँग्रेसचा विचार हा शाश्वत विचार असून देशाच्या विकासाचा विचार आहे. त्याला ताकद देण्याचे काम सर्वांनी करायचे आहे .राज्यात महाविकास आघाडीला मोठे अनुकूल वातावरण असून आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचा सरकार येणार असून मुख्यमंत्रीही महाविकास आघाडीच्या होणार आहे.

खरे तर राज्यामध्ये सध्याचे सरकार कसे आले हे मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री यांना माहिती आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. कारण जनतेला सर्व माहिती आहे. या सरकारविरुद्ध जनतेने राग व्यक्त केला असून महाविकास आघाडीला मोठा भक्कम पाठिंबा दिल्याबद्दल आमदार बाळासाहेब थोरात यांनी जनतेचे आभार व्यक्त केले असून हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा विजय असून यामध्ये काम केलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचे कौतुकही त्यांनी केले.

आमदार थोरात यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. थोरात नेमकं काय म्हणाले बघा व्हिडिओ…

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240604-WA0032.mp4

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,401
बाळासाहेब थोरात लोकसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार, १३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJune 13, 20260

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी हा…

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.