रविवार, २३ जून
नीट परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांची आज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने फेर परीक्षा झाली. यावर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी गोलमाल है भाई, सब गोलमाल है! अशी प्रतिक्रिया एक्स (X) वर व्यक्त केली आहे.
तांबे म्हणाले, आज नीट परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या १५६३ विद्यार्थ्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने फेर परीक्षा घेण्यात आली, ह्या परीक्षेला १५६३ पैकी ८१३ विद्यार्थीच हजर राहिले म्हणजेच ७५० विद्यार्थ्यांनी ही फेरपरीक्षा टाळली, ह्यातूनच नीटमध्ये गोलमाल झाल्याचे सिध्द होते.
तांबे यांनी नीट परिक्षेबद्दल भाष्य करत या विषयाला तोंड फोडलं आहे. जवळपास निम्म्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याचे टाळले असल्याने तांबे यांनी गोलमाल है भाई, सब गोलमाल है! असं म्हटलं आहे.


