Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आज नवीन सदस्यांच्या शपथेने सुरुवात; या कारणावरून विरोधक सरकारला सुरुवातीलाच कोंडीत पकडणार
राजकारण

१८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आज नवीन सदस्यांच्या शपथेने सुरुवात; या कारणावरून विरोधक सरकारला सुरुवातीलाच कोंडीत पकडणार

पहिल्याच दिवशी विरोधकांची ताकद दिसणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/06/2024Updated:24/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, २४ जून

अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सकाळी ११ वाजता सुरू होत आहे. आज पहिले दोन दिवस नव्या खासदारांचा शपथविधी होणार आहे. हंगामी अध्यक्षांच्या नियुक्तीशिवाय NEET-UGC पेपर लीक आणि इतर स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्याप्रकरणीही विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे, त्यामुळे पहिल्याच दिवशी गदारोळ होण्याची शक्यता आहे.

अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. ३ जुलैपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवशी नव्या खासदारांचा शपथविधी होणार आहे. नवीन लोकसभा अध्यक्षांची निवड बुधवारी होणार आहे, तर गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सातवेळा खासदार भर्तृहरी महताब यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केल्याचा निषेध नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठतेच्या आधारावर त्यांचे खासदार के. सुरेश हे या पदाचे प्रबळ दावेदार असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. मात्र, पराभूत न होता चालू लोकसभेत सलग सर्वाधिक काळ खासदार म्हणून काम करण्याच्या बाबतीत महताब हे ज्येष्ठ आहेत, अशी सरकारची भूमिका आहे.

सोमवारी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी राष्ट्रपती मुर्मू राष्ट्रपती भवनात महताब यांना लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ देतील. यानंतर महताब संसद भवनात पोहोचतील आणि सकाळी ११ वाजल्यापासून सभागृहाचे कामकाज सुरू करतील. दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक मिनिट मौन पाळून कामकाजाची सुरुवात होईल.

असे सुरू होईल लोकसभेचे कामकाज…

लोकसभेचे सरचिटणीस उत्पल कुमारसिंग प्रथम नवनिर्वाचित खासदारांची यादी मांडतील. हंगामी अध्यक्ष महताब हे सभागृह नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खासदार म्हणून शपथ देतील. यानंतर, स्पीकर पॅनेलची शपथ घेतली जाईल, त्यात समाविष्ट असलेले ज्येष्ठ खासदार हंगामी अध्यक्ष यांना २६ जूनपर्यंत सभागृह चालवण्यास मदत करतील.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4

२७ जूनला राष्ट्रपती मुर्मू यांचे अभिभाषण…

राष्ट्रपती मुर्मू गुरुवारी, २७ जून रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. यादरम्यान त्या नव्या सरकारच्या पंचवार्षिक योजना आणि प्राधान्यक्रम मांडतील. २८ जून आणि १ जुलै रोजी लोकसभा आणि राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान २ जुलै रोजी लोकसभेत आणि ३ जुलै रोजी राज्यसभेत चर्चेला उत्तर देतील. यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज काही काळासाठी तहकूब केले जाईल. २२ जुलैपासून पुन्हा अधिवेशन सुरू होणार असून त्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 581
अधिवेशन लोकसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काँग्रेस पक्षाचे…

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.