Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर मर्चंट्स बँक; अध्यक्षपदी राजेंद्र वाकचौरे तर, उपाध्यक्षपदी मुकेश कोठारी
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेर मर्चंट्स बँक; अध्यक्षपदी राजेंद्र वाकचौरे तर, उपाध्यक्षपदी मुकेश कोठारी

संगमनेरच्या अर्थकारणातील महत्त्वाची बँक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार ०९ जुलै | संगमनेर 

समाजातील अनेक घटकांसाठी जिव्हाळ्याचे असलेल्या व आर्थिक विकासाची गंगोत्री समजल्या जाणार्‍या संगमनेर मर्चंट बँकेच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक राजेंद्र वाकचौरे, उपाध्यक्षपदी मुकेश कोठारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी संगमनेर मर्चंट बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात सहाय्यक उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत एकमताने दोन्ही निवडी करण्यात आल्या.

यावेळी बँकेचे प्रमुख मार्गदर्शक उद्योजक राजेश मालपाणी म्हणाले, संगमनेर मर्चंट्स बँकेच्या लोकाभिमुख आणि वेगवान सेवेमुळे दिवसेंदिवस बँकेकडे अधिकाधिक ग्राहक आकर्षित होत असून बँकेच्या परिपूर्ण सेवेमुळे समाधानी होत आहेत. ग्राहकांची जिंकलेली मने आणि मिळवलेला विश्वास हाच बँकेचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे. सलग सहा दशके असा अनोखा पुरस्कार मिळवून जनतेच्या मनातील अढळस्थान टिकविण्याची किमया बँकेने करुन दाखविली आहे.

स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी यांनी आपल्या समविचारी सहकार्‍यांना सोबत घेऊन उदात्त भावनेने स्थापन केलेल्या बँकेचा मोठा विस्तार झाला आहे. भक्कम लोकाश्रय मिळाल्याने बँक प्रत्येक घटकाला आपल्या जिव्हाळ्याची आर्थिक संस्था वाटते. बदलत्या काळासोबत अत्याधुनिक तंत्राचा अचूक वापर केल्याने अनेक नामांकित बँकांच्या आक्रमणात देखील बँकेने प्रगतीचे घोडदौड कायम राखली आहे.

मागील सहा दशकांच्या वाटचालीत बँकेच्या आर्थिक सहाय्याने शेकडो व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक यांनी आपापल्या क्षेत्रात गरुड भरारी घेतली आहे. मर्चंट्स बँक म्हणजे हजारो सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार व हितचिंतक मिळून बनलेला मोठा परिवार आहे. नूतन अध्यक्ष वाकचौरे आणि उपाध्यक्ष कोठारी बँकेच्या नावलौकिकात आणखी भर घालतील असा विश्‍वास व्यक्त केला.

नूतन उपाध्यक्ष कोठारी यांनी संचालकपदाच्या पहिल्याच कारकिर्दीत संस्थेने आपल्यावर विश्वास दाखवला व बँकेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी राजेंद्र वाकचौरे व मुकेश कोठारी यांनी मावळते अध्यक्ष संतोष करवा व उपाध्यक्ष प्रकाश कलंत्री यांचा सत्कार केला.

अध्यक्षपदाच्या कार्यकाळात बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांची मोलाची साथ मिळाली. कार्यक्षेत्रातील जवळजवळ सर्वच विभागामध्ये बँकेने उत्कृष्ट प्रगती साधली अशी भावना मावळते अध्यक्ष संतोष करवा व्यक्त केली. प्रकाश कलंत्री यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीगोपाल पडताणी, प्रकाश राठी, संजय राठी, दिलीप पारख, गुरुनाथ बाप्ते आदी संचालकांनी मनोगत व्यक्त केले.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक मुख्याधिकारी, आजी-माजी संचालक, सभासद, ग्राहक व हितचिंतकांनी नूतन पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले. मधुसुधन नावंदर यांनी सूत्रसंचालन तर, मुकेश कोठारी यांनी आभार मानले.

विश्वास सार्थ ठरवणार…

बँकेच्या चेअरमनपदी काम करण्याची दुसर्‍यांदा संधी दिल्याबद्दल वाकचौरे यांनी संचालक मंडळाचे आभार मानले. संचालक मंडळाने सोपवलेली जबाबदारी आणि मार्गदर्शक राजेश मालपाणी यांनी दाखवलेला विश्वास नक्कीच सार्थ करुन दाखवू. – राजेंद्र वाकचौरे, नूतन अध्यक्ष.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,102
मर्चंट बँक राजेंद्र वाकचौरे राजेश मालपाणी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काँग्रेस पक्षाचे…

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.