Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असतानाच यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांच्या राजीनामा, नेमकं कारण…
महाराष्ट्र संवाद विशेष

पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असतानाच यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांच्या राजीनामा, नेमकं कारण…

चार वर्षांचा कार्यकाल होता शिल्लक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार २० जुलै

केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आपल्या वैयक्तिक कारणास्तव हा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, पूजा खेडकर प्रकरणामुळे सोनींनी राजीनामा तर दिला नाही ना, याबाबतदेखील आता अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

सोनी यांनी गेल्यावर्षीच यूपीएससीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ आणखी चार वर्षांनी २०२९ मध्ये संपणार होता. परंतु, त्यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच अचानकपणे राजीनामा दिल्याने यूपीएससी चर्चेत आली आहे. या राजीनाम्याचा अर्थ खेडकर प्रकरणाशीही लावला जात असल्याने खळबळ उडाली आहे. सोनी २०१७ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या घटनात्मक मंडळाचे सदस्य झाले. त्यानंतर १६ मे २०२३ रोजी त्यांची लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.

महत्त्वाची बाब म्हणजे यूपीएससी अध्यक्ष मनोज सोनी यांनी महिन्याभरापूर्वीच राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता. परंतु, त्यांच्या या राजीनाम्यावर अद्याप कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे की नाही, याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु, वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण समोर आल्यामुळेच त्यांनी या अध्यक्षपदाचा राजीनामा देत या प्रकरणातून काढता पाय घेतल्याची चर्चा करण्यात येत आहे. तर, धक्कादायक बाब म्हणजे, पूजा खेडकर यांचे फसवणुकीचे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक बोगस आयएएस अधिकाऱ्यांची प्रकरणे समोर येत आहेत. ओबीसी आणि आर्थिक मागास प्रवर्गाचा फायदा घेऊन काहींनी यूपीएससी परीक्षेत लाभ मिळविल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळेच की काय सोनी यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचा तर निर्णय घेतला नाही ना, असेही आता बोलले जात आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 753
मनोज सोनी यूपीएससी राजीनामा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काँग्रेस पक्षाचे…

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.