Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात लोखंडी पोल लावण्याच्या कारणावरून दोन गटांत राडा; दोन्ही गटांतील बेचाळीस जणांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

02/11/2026

सोमवार ०२ नोव्हेंबर —- आजच्या दिवसाचे राशिभविष्य

02/11/2026

जेव्हा पालकमंत्र्यांच्या हातात क्रिकेटची बॅट येते तेव्हा….

01/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ४ वर्ष, १२ हजार उद्योग बंद आणि ५ लाख बेरोजगार देशोधडीला…
राजकारण

४ वर्ष, १२ हजार उद्योग बंद आणि ५ लाख बेरोजगार देशोधडीला…

देशात ४९ हजार लघुउद्योग बंद पडले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, ३० जुलै 

विशेष प्रतिनिधी / मुंबई – राज्यातील उद्योगधंदे हे त्या राज्यातील तरुण-तरुणी यांच्या हाताला काम देतात. रोजगार देतात. परिणामी त्या राज्यातील बेकारी कमी होऊन तरुणांच्या हाताला रोजगार मिळतो. मात्र कोरोनाच्या महामारीनंतर म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये आणि महायुतीच्या सरकारमध्ये जुलै २०२० ते जुलै २०२४ या मागील चार वर्षांत राज्यातील बारा हजार लघुउद्योग बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राज्यात मागील अडीच वर्षांपासून महायुतीचे सरकार आहे. या अडीच वर्षांत राज्यातील अनेक उद्योगधंदे हे परराज्यात गेले. गुजरातमध्ये उद्योगधंदे पळवल्याची ओरड विरोधकांकडून होत आहे आणि हे सरकार गुजरात धार्जिने, महाराष्ट्र विरोधी असल्याची टीका विरोधकांकडून होत होती.

मात्र या अडीच वर्षातच नाही तर त्याआधीही म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील लघुउद्योग बंद होण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची उदासीनता दिसून येत आहे. हे लघु उद्योग सुरू राहावेत म्हणून मविआ किंवा महायुतीचे सरकार पुढाकार घेत नाही का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

देशात ४९ हजार लघुउद्योग बंद पडले… 

दुसरीकडे देशपातळीवर विचार केला तर गेल्या चार वर्षांत संपूर्ण देशात ४९ हजार ३४२ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग बंद पडले आहेत. या बंद पडलेल्या उद्योगधंद्यामुळे लाखो लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. लाखो लोकं बेरोजगार झाले आहेत. या बेरोजगारीचा आकडा पाहिला तर लाखोंच्या घरात आहे. या उद्योगधंद्यामुळे साडेतीन लाख लोकांना रोजगार मिळाला होता. परंतु देशपातळीवरही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात कामगारांना नोकरी गमवावी लागली आहे.

एकट्या महाराष्ट्रात ४९ हजार पैकी १२ हजार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग बंद पडले आहेत. धक्कादायक म्हणजे, या १२ हजार बंद पडलेल्या लघु उद्योगांमध्ये महाराष्ट्रातील ५ लाख ४ हजारच्यावर कामगारांची संख्या होती. गेल्या चार वर्षांत राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे बंद झाले आहेत. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा राज्यात उद्योगधंदे येत होते. मात्र अडीच वर्षांपूर्वी राजकीय भूकंप झाला, राजकीय उलथापालथ झाली त्यावेळी ज्या आमदारांनी बंड केले ते सुरुवातीला गुजरातमध्ये गेले होते आणि तिथून पुढे त्यांनी सरकार स्थापन केलं.

सरकारमध्ये आल्यानंतर अनेक उद्योगधंदे यांनी गुजरातला पळवले, गुजरातला नेले. त्यामुळं महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे ठरवून गुजरातला नेले आहेत. यावरून हे सरकार गुजरातधार्जिणं असल्याची टीका शिवसेना (ठाकरे गट) प्रवक्ता आयोध्या पोळ यांनी केली केली आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्योगधंद्यामध्ये अत्यंत वाईट अवस्था होती. चार वर्षांपूर्वी कोरोना होता. मविआ सरकारमध्ये राज्यातील विकास ठप्प झाला होता. परंतु अलीकडच्या काळात महायुती सरकारने अनेक उद्योगधंदे राज्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात अधिक गुंतवणूक आणि उद्योगधंदे कसे येतील, यासाठी हे सरकार प्रयत्नशील असल्याचं भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 526
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जेव्हा पालकमंत्र्यांच्या हातात क्रिकेटची बॅट येते तेव्हा….

01/11/2026

संगमनेर तालुका कोणाची जहागीरदारी नाही; जनतेने परिवर्तन घडविले: आमदार अमोल खताळ

01/11/2026

संगमनेरात दिवाळीच्या तोंडावर उफाळला वाद! एका नगरसेवकामुळे ठाकरेंची शिवसेना आक्रमक; वसुली आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर खळबळजनक आरोप! गोरगरिबांना त्रास देणारा तो नगरसेवक कोण?

01/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात लोखंडी पोल लावण्याच्या कारणावरून दोन गटांत राडा; दोन्ही गटांतील बेचाळीस जणांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar02/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात पूर्वकल्पना व प्रशासकीय सूचना झुगारून लोखंडी पोल…

सोमवार ०२ नोव्हेंबर —- आजच्या दिवसाचे राशिभविष्य

02/11/2026

जेव्हा पालकमंत्र्यांच्या हातात क्रिकेटची बॅट येते तेव्हा….

01/11/2026

संगमनेर तालुका कोणाची जहागीरदारी नाही; जनतेने परिवर्तन घडविले: आमदार अमोल खताळ

01/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.