Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?

June 14, 2026

आज रविवार, १४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 14, 2026

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डीच्या एमआयडीसीतील संरक्षण सामग्री निर्मिती कारखान्यातून दोन हजार तरुणांना रोजगार – महसूल मंत्री विखे पाटील
राजकारण

शिर्डीच्या एमआयडीसीतील संरक्षण सामग्री निर्मिती कारखान्यातून दोन हजार तरुणांना रोजगार – महसूल मंत्री विखे पाटील

महसूल पंधरवडा निमित्त राहाता येथे विविध शासकीय योजनांच्या वैयक्तिक लाभांचे मंत्री विखे यांच्या हस्ते वितरण
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 4, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, ०४ ऑगस्ट 

शिर्डी एमआयडीसीत संरक्षण सामग्री निर्मिती करणाऱ्या कारखान्यास शासनाने मंजुरी दिली असून या कारखान्याच्या माध्यमातून शिर्डी व राहाता परिसरातील २ हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. असे प्रतिपादन राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

महसूल पंधरवडा निमित्त राहाता येथे विविध शासकीय योजनांच्या वैयक्तिक लाभांचे मंत्री विखे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शिर्डीचे प्रांताधिकारी माणिकराव आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने, राहाता तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, मुख्याधिकारी वैभव लोंढे आदी उपस्थित होते.

सामाजिक अर्थसहाय्यातील संजय गांधी निराधार अनुदान,‌ इंदिरा गांधी,‌ श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन, आदिवासी शासकीय प्रमाणपत्र व शिधापत्रिकेचा प्रत्येकी पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे महसूलमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कृषी विभागाच्या ११ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात योजनांचा लाभ देण्यात आला. पोलीस विभागात शासन नियुक्ती मिळालेल्या स्थानिक युवतींचा व सीए परीक्षा पास झालेल्या युवकाचा महसूलमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मंत्री विखे म्हणाले, एका सप्ताहात योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहचू शकत नाही म्हणून ‘महसूल पंधरवडा’ साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. ‘पशुसंवर्धन पंधरवडा’ ही साजरा करण्यात येत आहे. या महसूल पंधरवड्यात महसूली दाखल्यांचे सर्वसामान्यांना प्रभावीपणे वितरण करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात १८९ तलाठ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. अत्यंत पारदर्शक पध्दतीत ही भरती प्रक्रिया पार पडली. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत‌ राहाता तालुक्यात ५४ हजार अर्ज भरण्यात आले. मुख्यमंत्री बळीराजा योजनेत शेतकऱ्यांचे शंभर टक्के वीज बील माफ करण्यात आले. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या उच्च शिक्षणासाठी मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय शासनाने घेतला.

मेळाव्यात सामाजिक अर्थसहाय्याच्या योजनेत ८१३ लाभार्थ्यांना व कृषी विभागाच्या १२०० लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. तालुक्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेत ७६ कोटी ३३ लाखांचा आरोग्य लाभ वितरित करण्यात आला. १७ हजार २६३ शेतकऱ्यांच्या खात्यात ९ कोटी ४४ लाखांचे दूध अनुदान देण्यात आले‌. ४४ हजार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला‌‌.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 522
महसूल पंधरवडा राधाकृष्ण विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विश्लेषण

रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?

By अनंत पांगारकरJune 14, 20260

पंतप्रधानपदाचा सर्वाधिक काळ कारभार केल्याच्या कारणास्तव नरेंद्र मोदी यांचा सुरू असलेला उत्सव कमालीचा चर्चेचा बनला…

आज रविवार, १४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 14, 2026

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026

बनावट दारू तयार करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 13, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.