Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चार चाकीतून दोन लाख रुपये लांबविले, पोलिसांना अद्याप तपास लागेना… गुन्हेगारांचा शोध लागला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, आरपीआयचे कैलास कासार यांचा इशारा
गुन्हेगारी

चार चाकीतून दोन लाख रुपये लांबविले, पोलिसांना अद्याप तपास लागेना… गुन्हेगारांचा शोध लागला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, आरपीआयचे कैलास कासार यांचा इशारा

संगमनेरात गुन्हेगारीत वाढ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/08/2024Updated:09/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, ०८ ऑगस्ट 

संगमनेरमधील एचडीएफसी बँकेतून काढलेले दोन लाख रुपये अल्टो कारमधून लंपास करण्याची घटना घडवून आठ दिवसांचा कालावधी उलटला असून संगमनेर पोलिसांना अद्यापही चोरट्यांचा शोध लावण्यात अपयश आले आहे. शहरातील चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांचे गुन्हेगारांवरील नियंत्रण संपले असल्याचे समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये अवैध धंद्यांना उधाण आले असून दागिने दुचाकी आणि रोकड रकमेच्या चोऱ्या देखील वाढल्या आहेत. पोलिसांना गुन्ह्यांचा छडा लावण्यात अपयश येत आहे. दुचाकी चोर, धूम स्टाईल दागिने पळविणारे आणि रोकड लंपास करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध लागत नसल्याने गुन्हेगारांचे फावले आहे.

२ ऑगस्ट रोजी वरवंडी येथील प्रवीण सोन्याबापु वर्पे हे आपला मित्र प्रमोद भाऊसाहेब शिंदे याच्यासोबत संगमनेर येथे शेततळ्याचे कागद घेण्यासाठी मारुती अल्टो ८०० या कारमधून आले होते. संगमनेर मध्ये आल्यानंतर प्रवीण वरपे यांनी एचडीएफसी बँकेतून दोन लाख रुपये काढले होते. त्यानंतर दोघेजण जेवण्यासाठी हॉटेल जोशी मध्ये गेले जेवण झाल्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास पैसे हातात असल्याने मित्राच्या सांगण्यावरून फिर्यादीने त्याच्याकडील रोकड गाडीच्या मागील सीट कव्हरमध्ये ठेवली होती.

त्यानंतर दोघेही घुलेवाडी येथील नावंदर टायर या दुकानात टायर घेण्यासाठी गेले होते. टायर घेतल्यानंतर दोघांनी दुकानदाराला ऑनलाईन पैसे दिले. दुकानातून बाहेर आलो तेव्हा मित्राच्या कारच्या डाव्या बाजूची मागील काच फुटलेली दिसली. त्यामुळे मित्राने ११२ क्रमांकाला कॉल केल्यानंतर तेथे पोलीस गाडी आली. पोलिसांसमक्ष गाडीची तपासणी केली असता दोन लाख रुपयांची रोकड लंपास झाल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रवीण सोन्याबापु वर्पे गाणे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्त विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्यापही पोलिसांना गुन्हेगारांचा शोध लागू शकलेला नाही.

… तर रस्त्यावर उतरावे लागेल 

गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या धंद्यांवर कारवाई करण्यात पोलीस टाळाटाळ करतात. त्यामुळे गुन्हेगारीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून रोकड लांबविण्याची घटना देखील त्याचाच एक भाग असावी, असा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी गावातील अवैध धंदे पूर्णतः बंद करावेत, असा इशारा काही दिवसांपूर्वीच पोलीस यंत्रणेला दिला होता. मात्र अद्यापही संगमनेर मधील गुन्हेगारीचा आलेख बघता तो उंचावत असल्याने पोलिसांनी होण्याचा चढा लावला नाही तर आरपीआयला (आठवले) लवकरच रस्त्यावर उतरावे लागेल.

कैलास कासार, शहराध्यक्ष, आरपीआय (आठवले)

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 9,095
कैलास कासार पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.