Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » काँग्रेसचे दोन आमदार मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या वाटेवर? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
राजकारण

काँग्रेसचे दोन आमदार मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या वाटेवर? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

उमेदवारीसाठी प्रयत्नशील
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, १४ ऑगस्ट 

विधानसभा निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसचे दोन आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन्ही आमदारांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पक्ष बदलाच्या चर्चेने वेग पकडला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्याचबरोबर इच्छुकांचीही चाचपणी सुरू आहे. मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने काही जण पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत. तर काहींनी पक्षांतर करण्याचा निर्णयही घेतला आहे. त्या दृष्टीने भेटीगाठी वाढल्या आहेत. विद्यमान आमदारही कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल? कोणत्या पक्षाच्या तिकीटावर विजयी होता येईल? विद्यमान पक्ष उमेदवारी देणार की नाही? याची चाचपणी करत आहेत.

अशा स्थितीत काँग्रेसचे दोन विद्यमान आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. या दोन आमदारांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्या मुळे हे दोघे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर अशी या दोन आमदारांची नावे आहेत. विधान परिषद निवडणुकीत ज्या काँग्रेस आमदारांनी क्रॉस वोटींग केली होती त्यांच्यात या दोघांचाही समावेश होता असा आरोप असून निवडणुकांच्या तोंडावर या दोन्ही आमदारांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्याबाबतची शिफारसही पक्ष श्रेष्ठीकडे करण्यात आली आहे. त्यामुळे पक्ष कारवाई करण्याआधीच स्वत: पक्ष सोडण्याचा पर्याय या दोघांकडे आहे. त्यामुळेच या दोघांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,182
एकनाथ शिंदे जितेश अंतापुरकर शिवसेना शिंदे गट हिरामण खोसकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar मोहसीन शेख | महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात…

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.