जाणून घ्या… आपलं शनिवारच (२४ ऑगस्ट) राशिभविष्य
मेष— राशीस्वामी आज स्वस्थानी असल्याने अचानक धनलाभ दर्शवतो. स्वतःचा इगो बाजुला सारुन आपले काम करुन घ्या.
वृषभ— व्ययातील चंद्र आज प्रवासामधुन आर्थिक लाभ दर्शवतो. आज आपण अतीशय हुशारीने समोरच्याकडून आपले काम करुन घ्याल.
मिथुन— व्ययातील गुरु मंगळ हर्षल अतीशय मेहनत करायला लावेल तर अन् तरच आपले आज कल्याण होईल नाहीतर अपमान होण्याचीच शक्यता जास्त आहे.

कर्क— कर्मस्थानी असलेला राशीस्वामी आज मेहनतीचा पुरेपूर मोबदला मिळवुन देईल.
सिंह— व्ययातील बुध व धनातील केतु कोर्ट कचेरीच्या कामात अडकवून ठेवतील. पुर्वी केलेल्या चांगल्या कर्मामुळे आज कोर्ट केसमधून सुटकारा मिळेल.
कन्या— आज अपमानित होण्याचा दिवस. साठविलेले पुण्य आज साथ देईल. पाण्यापासून सावध राहा. अपघात होण्याची शक्यता.
तुळ— व्ययातील केतु जुने दुखणे डोक वर काढेल सांभाळा. आज जिभेवर नियंत्रण ठेवा. जोडीदार साथ देईल.
वृश्चिक— पोटाचे आजार वाढतील. आजचा दिवस अतीशय कटकटीचा असेल गोड बोलुन मार्ग काढा.
धनु— आईच्या नातलगांकडून आज अचानक धनलाभ दर्शवतो. भाऊ-बहीण यांच्याबरोबर वादावादीचा दिवस.

मकर— धन स्थानातील राशीस्वामीमुळे आज मन:शांती मजबुत असेल.
कुंभ— आज अचानक धनलाभाचे योग दर्शवतात. नवीन वास्तु, नवीन वाहन खरेदीचे योग आहेत.
मीन— भरकटलेला दिवस. निर्णय क्षमता मजबुत ठेवा. गोड बोलुन काम करत रहा.
सिद्धस्वामी ज्योतिष (संपर्क – ९०२९९११४११)

