Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अकोले तालुक्यातील दळणवळणाच्या सुविधा सक्षम करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
राजकारण

अकोले तालुक्यातील दळणवळणाच्या सुविधा सक्षम करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पवार यांच्या हस्ते अकोले शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, ०६ ऑक्टोबर
अकोले – अकोले तालुक्यातील सर्व गाव-वाड्या, वस्त्यांमध्ये दळणवळणाची सुविधा सक्षम करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी‌ आज येथे दिली.
अकोले शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार डॉ. किरण लहामटे, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक सिताराम गायकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, अकोले नगरपंचायत मुख्याधिकारी पंकज गोसावी आदी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, गरिबांना‌ आरोग्यसेवा देण्यासाठी आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून या‌ योजनेचा फायदा अकोलेतील नागरिकांना होणार आहे. आदिवासी बांधव हे लोक परंपरा, संस्कृतीचे जतन करतात. आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत लोकाभिमुख योजना राबविण्यात येतात. निळवंडे धरणात नौकाविहारसारखी जलपर्यटन सुविधा देण्याचे काम भविष्यात शासन करणार आहे.
राज्य शासनाच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी उठवली‌, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना फायदा झाला. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. गरिबांतील घराच्या मुलींना आता उच्च शिक्षण मोफत घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेल्या पैशातून महिलांनी विविध गृहउद्योग सुरू केले आहेत. ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. या योजनेतील ऑक्टोंबर व नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे आठ दिवसांत भगीनींच्या बॅंक खात्यात दिले जातील.
राज्यात १ ऑक्टोंबरपासून शेतकऱ्यांच्या दूधाला ३५ रूपये लीटर दर मिळणार आहे. राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांचे १५ हजार कोटींचे वीज बील माफ करण्यात आले आहे. मुख्यमंत्री बळीराजा योजनेत शेतकऱ्यांना मोफत कृषी वीज पुरवठा करण्यात येत आहे. सर्व जाती-धर्मांच्या विकासासाठी शासनाने स्वायत्त संस्थांची निर्मिती केली. त्यातून विविध लोकाभिमुख योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. लहामटे, गायकर, यांनीही विचार व्यक्त केले.

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अकोले येथील महात्मा फुले चौक ते अगस्ती सहकारी साखर कारखाना रस्ता, बस स्थानक, बाजारतळ व नूतनीकरण केलेले अकोले तहसील कार्यालयाचे लोकार्पण तसेच धुमाळवाडी रस्ता व उपजिल्हा शासकीय रुग्णालय‌ कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ पुरस्कार प्राप्त अकोले तालुक्यातील उंचखडक जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचा तीन लक्ष रूपयांचा धनादेश देऊन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,512
अजित पवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवड

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर नगरपरिषद क्षेत्रासाठीच्या पथ विक्रेता तक्रार निवारण व…

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.