Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अजित पवारांनी जनसन्मान यात्रेत केली विद्यमान आमदार किरण लहामटे यांची उमेदवारी जाहीर! अकोल्याचाही उमेदवार ठरला…
राजकारण

अजित पवारांनी जनसन्मान यात्रेत केली विद्यमान आमदार किरण लहामटे यांची उमेदवारी जाहीर! अकोल्याचाही उमेदवार ठरला…

पवारांची जनसन्मान यात्रा अकोल्यात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, ०६ ऑक्टोबर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी आपल्या पक्षाचा दुसरा उमेदवार जाहीर केला आहे. नगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघातून पवार यांनी विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांची पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे.
अजित पवार यांची जनसन्मान यात्रा रविवारी अकोला येथे पोहोचली होती. येथील सभेत बोलताना विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी घड्याळ, काही ठिकाणी धनुष्यबाण तर काही ठिकाणी भाजपच्या कमळाचे चिन्ह असेल, असे सांगत त्यांनी या मतदारसंघात घड्याळ चिन्ह असल्याचे स्पष्ट करत लहामटे यांच्या नावाची घोषणा करत त्यांना दुसऱ्यांदा संधी देण्यास सांगितले.
पवार म्हणाले, मागच्या पाच वर्षाच्या कालावधीत केवळ तीन वर्षे काम करायला मिळाले. या काळात तुमच्या बहाद्दर आमदाराने माझ्या मागे लागून अकोले मतदारसंघासाठी भरघोस निधी मिळविला. आधीचे दोन वर्षे मिळाले असते तर आणखी जास्त काम करता आले असते, तिजोरी चा आर्थिक भार पाहून मला काम करावे लागत असतात.
जनसन्मान यात्रेदरम्यान मी कोणावरही टीका करत नाही. सरकारच्या माध्यमातून केलेली विकास कामे जनतेला सांगत आहे. तुम्ही फक्त येथे घड्याळाचे बटन दाबा. त्यानंतर तुमच्या अडचणी दूर करण्याचे काम आमचे आहे. आम्ही एकदा बहुमताजवळ गेलो की सरकार आलेच. विरोधकांनी लोकसभेला खोटा प्रचार केला. त्याची किंमत आम्हाला मोजावी लागली. केवळ अर्धा टक्का मत कमी पडले पण जागा किती गेल्या याचा विचार करा, असे देखील ते म्हणाले.
लाडकी बहीण योजना जात बघून आणली का? असा सवाल करत या योजनेचा सगळ्यांना फायदा होतोय. मी तुम्हाला कधी अडचणीत येऊ दिले नाही, त्यामुळे माय माऊलींना तुमचे आशीर्वाद मला पाहिजेच. राखीची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्ही फक्त सरकार आणा, आम्ही पुढील पाच वर्ष लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार असून शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असल्याचे देखील ते म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 968
अजित पवार उमेदवार किरण लहामटे जनसन्मान यात्रा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.