Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भावी शिक्षकांनीही गिरविले अर्थ साक्षरतेचे धडे… भारत जगासाठी आश्वासक गुंतवणूक केंद्र – कडलग
महाराष्ट्र संवाद विशेष

भावी शिक्षकांनीही गिरविले अर्थ साक्षरतेचे धडे… भारत जगासाठी आश्वासक गुंतवणूक केंद्र – कडलग

जीडीपी वाढीचा वेग बघता २०४७ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकाची
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, ०८ ऑक्टोंबर 

संगमनेर – रशिया युक्रेन युद्ध, इराण इस्त्राईल संघर्ष या पार्श्वभूमीवर जागतिक परिस्थिती अस्थिर झाली असतानाही भारत जगासाठी आश्वासक असे गुंतवणूक केंद्र आहे. सद्यस्थितीत भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. भारताचा जीडीपी वाढीचा वेग बघता २०४७ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकाची होईल, असा आशावाद एमएफडी सुनील कडलग यांनी व्यक्त केला.

संगमनेर येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रेरणा कार्यक्रमात कडलग ‘चला अर्थ साक्षर होऊयात’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भालचंद्र भावे, एमबीए कॉलेजचे प्राचार्य डॉ. किरण गोंटे, प्रा. राजू शेख उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रा. नयना पंजे यांनी कार्यक्रमामागचा उद्देश स्पष्ट केला.

कडलग म्हणाले, सद्यस्थितीत जागतिक परिस्थिती अतिशय अस्थिर व युद्धजन्य आहे. मात्र जगाला शांतता हवी आहे. भविष्यात युद्धविराम होऊन अर्थव्यवस्था जोरदार घोडदौड करेल. भारतीय अर्थव्यवस्था ६.५ ते ८ प्रतिशत वाढण्याची क्षमता गृहीत धरली तर २०२५ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन अमेरिकन डॉलरची होईल. व २०४७ च्या दरम्यान भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकाची असेल. सद्यस्थितीत जागतिक पातळीवर एकूण पंधरा देश भारतीय रुपया या चलनाचा वापर करत आहेत ही बाब भारताचे महत्त्व अधोरेखित करते.

सद्यस्थितीत केंद्र शासनाच्या मॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहन देण्याच्या धोरणामुळे येत्या काही कालावधीत मॅन्युफॅक्चरिंगचे प्लांट्स इन्स्टॉल होतील. त्यानंतर दुसऱ्या फेजमध्ये उत्पादन सुरू होईल आणि तिसऱ्या फेजमध्ये उत्पादिते निर्यात केली जातील. या सर्व पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू होऊन भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पुढे जाईल.

सद्यस्थितीत भारताचे प्रज्ञावंत परदेशात जात आहे हा ओघ यामुळे बंद होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. कमी किमतीत टर्म इन्शुरन्स, पुरेसा आरोग्य विमा, वैयक्तिक अपघात विमा, वाहन विमा आणि इक्विटी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून संपत्ती निर्माण या विषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर भावे यांनी शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून बाहेर पडणारा भावी शिक्षक हा अर्थसाक्षर झाल्यास भारत देश सामर्थ्य संपन्न बनेल यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.

प्रा. प्रतिमा उगले-गाडे यांनी म्युच्युअल फंड गुंतवणूक करताना सल्लागारांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते असे सांगितले. विद्यार्थी शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना सुनील कडलग व प्राचार्य डॉ. भालचंद्र भावे यांनी उत्तरे दिली.

याप्रसंगी अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या सविता घुले, प्रा. मंगल आरोटे, प्रा. कविता काटे, प्रा. ज्योती मेस्त्री, प्रा. संजय खेमनर, प्रा. चंद्रकला सापनर, प्रा. कविता भोकनळ, प्रा. सूवर्णा चौधरी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विलास पांढरे यांनी तर आभार प्रा. राजु शेख यांनी मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 735
अर्थ साक्षरता शिक्षण शास्त्र महाविद्यालय सुनील कडलग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.