Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सध्याच्या महसूल मंत्र्यांचे कार्यक्षेत्र कनोली-मनोली-कनकापूर पुरतेच मर्यादित, तालुक्यात वाईट प्रवृत्ती येऊ देऊ नका – आमदार बाळासाहेब थोरात
राजकारण

सध्याच्या महसूल मंत्र्यांचे कार्यक्षेत्र कनोली-मनोली-कनकापूर पुरतेच मर्यादित, तालुक्यात वाईट प्रवृत्ती येऊ देऊ नका – आमदार बाळासाहेब थोरात

चुकीच्या लोकांमुळे तालुक्यात ढाबा संस्कृती वाढतेय
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर तालुका दादागिरी करत नाही आणि सहनही करणारही नाही…

रविवार, १३ ऑक्टोंबर 

सत्ता सामान्य माणसाच्या विकासासाठी असते मात्र याचा विसर पडलेली, सत्ता आणि पैशाच्या जीवावर राजकारण करणारी काही मंडळी सध्या आपल्या तालुक्यात फिरत आहे. मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने राज्यभर फिरून काम करण्याऐवजी सध्याच्या महसूल मंत्र्यांचे कार्यक्षेत्र कनोली-मनोली-कनकापूर पुरतेच मर्यादित राहिले आहे, अशी टीका मंत्री विखे यांच्यावर करत संगमनेर तालुक्यात वाईट प्रवृत्ती येऊ देऊ नका, असे आवाहन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील निमोण येथे आयोजित एका संस्थेच्या कार्यक्रमात थोरात बोलत होते. युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर यावेळी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, मंत्रीपदाचा एक मान असतो. आपणही महसूल मंत्री म्हणून सहा वर्ष काम केले. मात्र या कार्यकाळात कधीही कुणाची अडवणूक केली नाही. या उलट सध्याचे महसूल मंत्री सत्तेचा वापर करून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मोठ्या अडचणी निर्माण करत आहे. सध्याचे मंत्री मुरूमाचा ट्रॅक्टर पकडण्यासाठी कोतवालाला फोन करतात, इतकी वाईट अवस्था सध्या निर्माण झाली आहे.

संगमनेर तालुक्यातील विकास कामांना त्यांनी घातलेला खोडा येथील जनता विसरणार नाही, असा आशावाद व्यक्त करत गोरगरिबांच्या अन्नात माती कालविणाऱ्या प्रवृत्ती सर्वांनी एकजुटीने रोखायला हव्या. तालुक्यात बाहेरच्या राज्यातील पदाधिकारी येऊ लागल्याने तालुक्यात त्यांच्या माध्यमातून ढाबा संस्कृती वाढत असून तरुण पिढी बिघडविण्याचे काम सुरू आहे. हे सर्व रोखतांना त्यांच्यासोबत असलेल्या खबऱ्यांचाही वेळीच बंदोबस्त करण्याचे आवाहन थोरात यांनी केले.

संगमनेर तालुका दादागिरी करत नाही आणि सहनही करणारही नाही…

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हा तालुका आर्थिकदृष्ट्या समृद्ध बनला आहे. तालुक्यात शांतता आणि आनंदाचे वातावरण आहे. गत चाळीस वर्षात झालेल्या कामातून हा तालुका उभा राहिला आहे. मात्र निवडणूक आली म्हणून विरोधक इकडे येत आहे. त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाहीत त्यामुळे ते तुमच्यासमोर खोटे बोलत आहे. दडपशाहीच्या राजकारणासाठी ही मंडळी इकडे येत असली तरी हा तालुका दादागिरी करत नाही आणि दादागिरी सहनही करणार नाही. थोरात यांच्या मागे तालुका भक्कमपणे उभा आहे. – डॉ. जयश्री थोरात.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,083
जयश्री थोरात निमोण बाळासाहेब थोरात राधाकृष्ण विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.