Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाजप आणि महसूल मंत्री विखेंना मोठा राजकीय धक्का… जनसेवा मंडळाचे शेकडो कार्यकर्ते थोरातांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये!
राजकारण

भाजप आणि महसूल मंत्री विखेंना मोठा राजकीय धक्का… जनसेवा मंडळाचे शेकडो कार्यकर्ते थोरातांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये!

मंत्री विखे पाटलांच्या संगमनेरमध्ये कूरघोड्या सुरू असतानाच थोरातांनी मंत्र्यांच्या बालेकिल्ल्याला पाडले खिंडार!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/10/2024Updated:14/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बाळासाहेब थोरातांची शिर्डी विधानसभा मतदारसंघात साखर पेरणी, महाविकास आघाडीची ताकद वाढली

सोमवार, १४ ऑक्टोबर

संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील मालुंजे या गावातील जनसेवा मंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची साथ सोडत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा हात हाती घेतला आहे. महसूल मंत्री विखे पाटील यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप व विखे गटाला मोठे खिंडार पाडण्यात थोरात यशस्वी झाले आहे.

अमृतवाहिनी सहकारी बँक येथे मालुंजे येथील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, शेतकी संघाचे संचालक संतोष नागरे, मार्केट कमिटीचे संचालक संजय खरात, युवक काँग्रेसचे शेखर सोसे, सोसायटीचे उपाध्यक्ष सुमित सोसे, लहानू नागरे, कल्पेश आव्हाड, योगेश जोशी, मल्हारी ईघे आदी उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल ठरला असून आमदार थोरात यांनी कायम सर्वधर्मसमभाव जोपासत गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम केले आहे. सर्वांना समान संधी दिली आहे. याउलट भाजपामध्ये फक्त दडपशाही होत असून कार्यकर्त्यांचा केवळ निवडणुकीसाठी वापर केला जातो.

त्यामुळे जनसेवा मंडळाच्या राजेंद्र आव्हाड, संपत सोसे, संदीप डोंगरे, प्रकाश खरात, संजय साठे, भाऊसाहेब खरात, वैभव सोसे, साहेबराव सोसे, रमेश पिंपळे, सोमनाथ पिंपळे, संतोष घुगे, भिकाजी भागा घुगे, प्रवीण गाडेकर, गोविंद सोसे यांच्यासह शेकडो युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यात समावेश आहे.

संतोष नागरे म्हणाले, संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून प्रत्येक गावात आणि वाडी वस्तीवर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या योजना राबवल्या आहेत. संगमनेर तालुका सुसंस्कृत आणि पुरोगामी विचारांचा तालुका आहे. येथे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि म्हणून जनसेवा मंडळाचे अनेक कार्यकर्ते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक आहेत.

यापुढेही अनेक लोक काँग्रेस पक्षात येणार आहेत. मालुंजे येथील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने विखे गटाला मोठे खिंडार पडले आहे. या सर्व नवीन प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, बाबासाहेब ओहोळ, गणपतराव सांगळे, शिर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेते सुरेश थोरात आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,613
पक्षप्रवेश बाळासाहेब थोरात मालुंजे राधाकृष्ण विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –  गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर सायखिंडी येथील श्री मनोहरबाबा विद्यालयात…

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.