Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

मंगळवार, ०६ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

06/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महायुतीला मोठा धक्का, आचारसंहिता जाहीर होताच महादेव जानकर यांचा युतीला रामराम; सर्वच्या सर्व २८८ जागा स्वबळावर लढणार!
राजकारण

महायुतीला मोठा धक्का, आचारसंहिता जाहीर होताच महादेव जानकर यांचा युतीला रामराम; सर्वच्या सर्व २८८ जागा स्वबळावर लढणार!

लोकसभेत झाला होता पराभव
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

प्रवीण पुरो | बुधवार, १६ ऑक्टोबर

मुंबई – विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होऊन २४ तासांचा अवधीही झाला नाही, तोच महायुतीला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली. जानकर यांचा पक्ष आता राज्यात २८८ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार आहे.

महायुतीच्या जागा वाटपात आपल्या पक्षाला विचारात घेतलं गेलं नसल्याच्या कारणाने महादेव जानकर यांनी हा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला, अशातच राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख जानकर यांनी महायुतीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला.

जानकर यांच्या निर्णयामुळे महायुतीला मोठं खिंडार पडलं आहे. महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी एक-दोन दिवसात जाहीर होणार असून, त्यात महादेव जानकर यांच्या पक्षाचा विचार केला गेला नाही. या कारणाने नाराज झालेल्या जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडत राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाय. जानकर यांच्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादीसुद्धा दोन दिवसात जाहीर होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

जानकर यांची एक्झिट महायुतीसाठी धोक्याची घंटा…

गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर हे महायुतीमध्ये योग्य तो सन्मान भेटत नसल्याने नाराज असल्याची माहिती आहे. जानकर यांनी महायुतीकडे विधानसभेसाठी ४० ते ५० जागांची मागणी केली होती. पण त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. या कारणामुळेच अखेर त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. आज मुंबईत झालेल्या महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेलाही जानकर उपस्थित नव्हते. जानकर महायुतीतून बाहेर पडल्याने महायुतीने आपला पहिला मित्रपक्ष गमावला. राज्यातील धनगर समाजाचा मोठा पाठिंबा जानकर यांना आहे. सोलापूर, बारामती, परभणी, बीड, जालना, मराठवाड्यातील काही भाग आणि कर्नाटकलगतच्या प्रदेशातसुद्धा त्यांची मोठी ताकद आहे. अशा परिस्थितीत महायुतीतून महादेव जानकर यांची एक्झिट ही महायुतीसाठी फार मोठी डोकेदुखी ठरणारी आहे.

लोकसभेत झाला होता पराभव… आता झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी महादेव जानकर महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या तयारीत होते. यासाठी त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चाही सुरू केली होती. परंतु अखेरच्या क्षणी महादेव जानकर यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. महायुतीने महादेव जानकर यांच्यासाठी परभणी लोकसभेची एक जागा सोडली होती. परंतु तेथे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,032
अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस महादेव जानकर महायुती रासप
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मजबुरी का नाम मोदी, मजबुती का नाम महात्मा गांधी!

02/10/2026

आमदार अमोल खताळ शेतकऱ्यांच्या बांधावर; पिकांसंदर्भात अधिकाऱ्यांना या सूचना

01/10/2026

नाशिक-पुणे रेल्वे सिन्नर-संगमनेर मार्गानेच झाली पाहिजे! आमदार सत्यजीत तांबे यांचा सरकारला थेट इशारा, अन्यथा आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे रोखणार

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- उडीसा आणि आसाम या राज्यांतून पुण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी…

मंगळवार, ०६ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

06/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.