शनिवार, १९ ऑक्टोबर २०२४
मेष – आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने महत्त्वाची कामे हातावेगळी करण्याचा प्रयत्न कराल. आपल्याला परदेशातून अपेक्षित असलेले संदेश येतील.
वृषभ – दैनंदिन कामे सातत्याने पूर्ण करावी लागणार आहेत. मानसिक तणाव किंवा प्रकृती अस्वस्थ यामुळे काम करण्यास उत्साह नसेल. एखादी महत्त्वाची बातमी समजण्याची शक्यता आहे.
मिथुन – आजचा दिवस आपल्याला सावधतेने घालवावा लागणार आहे. आपला कामाचा वेग चांगला राहणार आहे. आर्थिक व्यवहार होतील, मात्र दुसऱ्यावर जास्त विश्वास ठेवू नका.
कर्क – नवीन कामे मिळतील, पण त्याचा पूर्णपणे आधी आपण अभ्यास करून घ्यावा. अडचणींना सामोरे जावे लागणार आहे, चिकाटी आणि सातत्य यांनी तुमची काम व्यवस्थित होतील.
सिंह – नवीन नवीन उपक्रम राबवाल. नवीन नवीन काम करण्यासाठी उत्साह राहणार आहे. आर्थिक व्यवहार चांगले होतील. करारमदार पण चांगले झाल्यामुळे आपल्याला लाभ चांगल्या प्रमाणात होणार आहेत.
कन्या – आजचे ग्रहमान आपणासाठी अनुकूल आहे. सर्व दृष्टिकोनातून आपल्याला फायदेशीर होणार आहे. मोठे प्रश्न किंवा चिंता दूर करण्याचा मार्ग सापडतील, घरातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल.

तुळ – जुन्या मित्रांशी गाठीभेटी होतील, किंवा फोनवरून संपर्क साधला जाईल. छोटे-मोठे जे गैरसमज झाले आहेत ते दूर कराल. संपूर्ण मळभ दूर झाल्यामुळे दोघांनाही आनंद वाटेल. दिवस समाधानाचा जाईल.
वृश्चिक – आर्थिक विवंचना दूर होतील. शांत व तणावमुक्त रहाल. काम वेळेवर पूर्ण होतील कुठल्याही प्रकारची घाई गर्दी करू नका. आपल्या योग्य हालचाली होतील व महत्त्वाची कामे मिळवू शकाल.
धनु – मरगळ दूर होईल उत्साहाने आनंदाने कामाला लागा. नवीन प्रस्ताव समोर येतील. योग्य प्रस्ताव निवडणे आपणास आवश्यक आहे. कामात अडचणी आल्या तरी त्या योग्य तन्हेने सोडवा.
मकर– आपल्यासमोर मोठे प्रस्ताव येणार आहे. व्यापार व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी आपणास गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यासाठी आपणास कर्ज हवे असल्यास ते मिळेल. प्रवास होण्याची शक्यता.
कुंभ– आपल्या कामांमध्ये चांगली प्रगती कराल. आपल्या अधिकाराचा वापर योग्य पद्धतीने करून घ्या. आर्थिक व्यवहार मनासारखे होतील. आपल्या सहकाऱ्यांचा पण लाभ करून द्याल. दिवस चांगला जाईल.
मीन – महत्त्वाच्या कामांमध्ये जास्त लक्ष घालावे लागेल. कोणत्याही कामामध्ये घाई गर्दी करू नका नीट आणि शांतपणे कामे करा. सरकारी कामे असतील तर तीही करून घेणे, त्यात अडचणी येणार नाहीत.

